Pakistan Asim Munir visit LoC raised the Kashmir issue agian
इस्लामाबाद: ऑपरेशन सिंदूर नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंब्याचा आणि खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे. चीनसह मुस्लिम राष्ट्रांनी देखील पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला फटकारले आहे. अशातच एकीकडे अपमान होत असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधी विष ओकले आहे. पाकिस्तानचे असीम मुनीर यांनी बकरी ईद निमित्त (LoC) नियंत्रण रेषेला भेट दिली. यावेळी या रेषेर तैनात असलेल्या सैनिकांची भेट त्यांनी भेट घेतली. त्यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भारतविरोधी अजेंडाचे गाणे गायले.
एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खोटारडेपणाचा पर्दाफाश होत आहे, तरीही दुसरीकडे पाकिस्तानच्या भारताविरोधी कुरापती सुरुच आहेत. नियंत्रण रेषेवर असीम मुनीर यांनी त्यांच्या सैनिकांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या मनोबल आणि सतर्कतेची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी अलीकडील भारत आणि पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानी लष्कराने भारताला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्वत:चे गुणगाण केले. तसेच भारताविरोधी कारवाईत पाकिस्तानचा विजय झाला असल्याचा खोटा दावाही त्यांनी केला.
याशिवाय मुनीर यांनी काश्मीरचा मुद्दा देखील पुन्हा उपस्थित केला. त्यांनी पाकिस्तान लोकांचा काश्मीरच्या नागरिकांना न्याय संघर्षाला समर्थन देत राहिल असे म्हटले. तसेच हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार, आणि काश्मीर लोकांच्या अपेक्षेनुसार सोडवला पाहिजे असे त्यांनी म्हटले. असीम मुनीर यांचे हे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. धार्मिक आणि राजकीय स्तरावर हे विधान गाऊन पाकिस्तान पुन्हा पुन्हा काश्मीर मुद्दाचा डाव खेळतो.
असीम मुनीर यांच्या या विधानाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावर राजकारण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सध्या पाकिस्तान अंतर्गत संघर्षात अडकलेला आहे. अनेक आर्थिक अडचणी पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्या आहे. पण तरीही पाकिस्तान जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सातत्याने काश्मीरचा वापर केला जात आहे.
काश्मीर नेमका कुणाचा? भारताने स्पष्टचं सांगतिले,
यापूर्वी देखील पाकिस्तानने अनेक वेळा जगातिक स्तरावर काश्मीर मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. यावर भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहिल. तसेच भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याचा अधिकार पाकिस्तानला नाही. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक खोटारडेपणाचा आणि दहशतवाद्याला पाठिंब्याचा पर्दाफाश झाला आहे. एवढे होऊनही पाकिस्तान पुन्हा पुन्हा काश्मीर मुद्द्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.