मौलवीने माझे कपडे काढले अन्...; पाकिस्तानी मदरशाबद्दल फ्रेंच मीडियाचा धक्कादायक खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्रेंच प्रसार माध्यमांनी एका अहवालात पाकिस्तान मदरशाबद्दल खळबजनक दावा केला आहे. फ्रेंच मीडियाने पाकिस्तानच्या मदरशांमध्ये मुलांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. इस्लामिक शिक्षणाच्या नावाखाली हा सर्व कारभार पाकिस्तानच्या मदरशांमध्ये होतो असे फ्रेंच माध्यमांनी म्हटले आहे. या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा पाकिस्तानचा दहशतवाद्याला पाठिंब्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश होत आहे. याच वेळी या घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान झाला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या मदरशांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. या घटना पाकिस्तामध्ये सामान्य झाल्या असून तेथील लोकांना कोणताही फरक पडत नाही असे फ्रेंच मीडियाचे म्हणणे आहे. इस्लामिक शिक्षण देण्याच्या आणि सांस्कृतिक वारशाच्या आड लहाना मुलांना भयानक कृत्याला सामोरे जावे लागत आहे.
फ्रान्स २४ च्या अहवालात, पीडित मुलांची मुलाखत घेण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी मुलांनी मदरशांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या क्रूर आणि भयावह अत्याचाराचा खुलासा केला. मुलांनी सांगितले की, मदरशांमध्ये शिक्षण देणारे मौलवी, इस्लामिक जबादारी देतात. त्यांचे लैंगिक शोषण करतात. केवळ मुलीच नाही तर मुलांवरही लैगिंक अत्याचार मौलवी करतात.
अहवालात, पाकिस्तामध्ये ३६ हजारांहून लैगिंक अत्याचाराच्या घटना नोंदणीकृत आहेत, अजूनही काही घटनांचा खुलासा झालेला नाही. पाकिस्तानच्या मदरशांमध्ये जवळपास २२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. या मुलांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोयही मदरशांमध्ये केली जाते.
एका १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेने मुलाखतीदरम्यान आपली व्यथा मांडली. तिने सांगतिले की, एका धर्मगुरुंनी तिला कपडे काढायला लावले आणि तिचे लैंगिक शोषण केले. तसेच आणखी एका अल्पवयीन पीडितेने तिला इस्लामिक पाठ शिकवण्याच्या बहाण्याने मौलवीनी तिला घरी नेले आणि तिचे कपडे काढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच आणखी एका पीडितेने त्याला जबदरदस्तानी पॅंट काढायला लावण्यात आली, माझ्याशी खूप घाण वागत होते, मी सतत रडत होतो असे म्हटले.
अहवालात पीडितांसोबतच पोलिसांचे, पीडितांच्या कुटुंबाचे देखील मुलाखतीबद्दल सांगण्यात आले आहे. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये अशा घटनांची नोंद केली जात नाही. सरकारकडून मदरशांच्या मौलवींना पाठिंबा मिळतो असे पीडितांच्या कुटुंबांनी म्हटले आहे. यामुळे मदरसे आणि मौलीवींवर कारवाई केली जात नाही.
२०२३ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील जामिया अल-मुस्ताफा या मदरशात मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोन मौलवींना अटत करण्यात आली होती. परंतु अशा अनेक घटना आहेत, ज्या नोंदवल्या गेल्या नाहीत.