Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan-Balochistan : ‘बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या’; मीर यार बलोच यांची जगाला साद

Pakistan-Balochistan : बलुच स्वातंत्र्यसमर्थकांकडून 11 ऑगस्ट हा ‘बलुचिस्तान स्वातंत्र्यदिन’ म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने बलुच नेते मीर यार बलोच यांनी स्वतंत्र बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली. बलुचिस्तानचा मुद्दा जगभर पोहोचवल्याबद्दल त्यांनी विशेषतः भारतीय माध्यमांचे आभार मानले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 11, 2026 | 09:13 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • भारतीय माध्यमांचे विशेष कौतुक
  • पाकिस्तानवर जोरदार निशाणा
  • स्वतंत्र राष्ट्राच्या दिशेने पुढे जाण्याचा दावा
Pakistan-Balochistan : 11 ऑगस्ट हा दिवस बलुच स्वातंत्र्यसमर्थकांकडून ‘बलुचिस्तान स्वातंत्र्यदिन’ म्हणून पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर बलुच नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका मांडत स्वतंत्र बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, बलुचिस्तानचा आवाज जगभर पोहोचवण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी भारतीय माध्यमांचे विशेष कौतुक आणि आभार मानले आहेत.

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

भारतीय माध्यमांचे विशेष कौतुक

स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात मीर यार बलोच यांनी भारतीय माध्यमांसह जगभरातील माध्यमे, संशोधक, विचारवंत, लेखक, विद्यार्थी आणि नागरी समाजाचे आभार मानले. बलुचिस्तानमधील परिस्थिती, नागरिकांचे प्रश्न आणि स्वातंत्र्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले.

बलुच नेतृत्वाकडून भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. बलुच स्वातंत्र्यसमर्थकांकडून यापूर्वीही भारताने त्यांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Indian Navy : हिंद महासागरातील चीनचे आव्हान; नौदलप्रमुख कृष्णा स्वामीनाथन मॉरिशस दौऱ्यावर

पाकिस्तानवर जोरदार निशाणा

मीर यार बलोच यांनी पाकिस्तानच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. बलुचिस्तानमधील कथित दडपशाही, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि राजकीय कार्यकर्त्यांवरील कारवाईचा त्यांनी उल्लेख केला.

पाकिस्तानविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेताना त्यांनी ‘कॅन्सरसारख्या पाकिस्तानला बलुचिस्तानमधून दूर करणे आवश्यक आहे’, अशा आशयाचे वक्तव्य केले. मात्र हा शब्दप्रयोग बलुच स्वातंत्र्यसमर्थक नेतृत्वाची राजकीय उपमा आणि आरोप आहे.

दरम्यान, बलुच नेतृत्वाने पाकिस्तानच्या ताब्यातील बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी पुन्हा केली आहे. संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी या मागणीला मान्यता दिलेली नाही.

PoK Protest : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाला ‘काळा दिवस’;परदेशातील दूतावासांसमोर निदर्शनांचे आवाहन

स्वतंत्र राष्ट्राच्या दिशेने पुढे जाण्याचा दावा

बलुच स्वातंत्र्यसमर्थकांनी भविष्यात स्वतंत्र राष्ट्रासाठी स्वतंत्र पासपोर्ट, चलन, माध्यम संस्था, व्यापार व्यवस्था आणि राजनैतिक प्रतिनिधित्व उभारण्याचा दावा केला आहे. त्यामुळे 11 ऑगस्टच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या या भूमिकेला केवळ प्रतीकात्मक स्वातंत्र्यदिनापुरते मर्यादित न ठेवता राजकीय आणि राजनैतिक पातळीवर पुढे नेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधी असंतोष आणि सशस्त्र संघर्षाची पार्श्वभूमी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय चर्चेत आला आहे.

Web Title: Pakistan balochistan recognize balochistan as an independent country mir yar balochs appeal to the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Balochistan
  • Independence Day
  • Pakistan News

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
2

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
3

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
4

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.