pakistan defence minister khawaja asif on pakistan flood
Pakistan Flood news in Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानच्या पंजाबा प्रांतात पुरामूळे प्रचंड हाहा:कार माजला आहे. २६ जून पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पाकिस्तानच्या अनेक भागांना झोडपले आहे. गेअनेक रस्ते, घरे पाण्याखाली गेली आहेत.यामुळे ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हजारो लोक बेघर झाले आहेत. परिस्थितीत अधिक बिकट झाली आहे. अशा परिस्थिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी असे विधान केले आहे. यामुळे पाकिस्तानचे नागरिक चक्रावले आहेत, तर यावर संतापही व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी जनतेला पुराचे पाणी साठवण्याचा सल्ला दिला आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. ख्वाजा यांना लोकांना मदत पोहोचवण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना त्यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
सुदानमध्ये भूस्खलन; तब्बल 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती, दारफूरमधील अख्खं गाव झालं उद्ध्वस्त
खाव्जा यांनी म्हटले की, सध्या संपूर्ण जगभरात पाण्याची टंचाई आहे, अशा परिस्थिती देशात आलेला पूर आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. यामुळे लोकांनी या अल्लाहचा आशीर्वाद समजावा. ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून अल्लाहने आपल्यावर खूश होऊन पावासाचा वर्षाव केला आहे. यामुळे पाणी साठवून ठेवा, असे त्यांनी म्हटले आहे.
ख्वाजा यांनी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वाच्या नागिरकांना सल्ला दिला आहे. त्यांनी लोकांना पाणी साठवून घरी घेऊन जा असे म्हटले आहे. यासाठी मोठ्या धरणाची आवश्यकता असली तर ते बांधणे शक्य नाही. यामुळे घरातील छोट्या छोट्या वस्तूंमध्ये ते साठवून ठेवा.तसेच त्यांनी सरकारकेड पूर व्यवस्थापनेवर कोणतेही उपाय नाहीत. लोक सरकारवर खोटे आरोप करच आहे. यासाठी स्थानिक लोकच जबाबदार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या अशा विधानामुळे पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावरुन पाकिस्तान सरकार आपल्याच नागरिकांची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात २० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहे. सतलज, चिनाब, झेलम आणि रावी नद्या पूरग्रस्त झाल्या आहेत. यामुळे देशात मानवी आणि अन्नसंकटाची लाट आली आहे. पंजाब प्रांतात पहिल्यांदाच असा मोठा पूर आला असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी पाकिस्तानने भारतामुळे त्यांच्या देशात पूर आल्याचा आरोप केला आहे. पंजाबच्या वरिष्ठ मंत्री मरियम औरंगजेब यांनी भारताने जाणूनबुजून धरणाचे पाणी सोडले असल्याचे म्हटले आहे. भारताने नद्यांमधून पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.