Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युद्ध नको, तेल…’ पाक संरक्षण मंत्री Khawaja Asif यांनी USच्या ‘शांती’ नाटकाची उडवली खिल्ली; इराणने 15-कलमी योजना फेटाळली

US-Iran Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापार ९५ टक्क्यांनी घटल्यानंतर अमेरिकेने याला आपल्या शांतता प्रस्तावाचा एक महत्त्वाचा भाग बनवला आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 26, 2026 | 01:07 PM
pakistan defence minister mocks us iran rejects trump 15 point plan hormuz trade drop 2026

pakistan defence minister mocks us iran rejects trump 15 point plan hormuz trade drop 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचा अमेरिकेवर निशाणा
  • इराणचा ‘नो-कॉम्प्रोमाईज’ पवित्रा
  • होर्मुझमध्ये ९५% व्यापार ठप्प

Khawaja Asif statement on US Iran war : मध्य-पूर्वेतील युद्धाची (US-Israel Iran War) धग आता केवळ रणांगणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता शब्दांच्या युद्धात रूपांतरित झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसमोर शांततेचा ‘१५-कलमी’ प्रस्ताव ठेवला खरा, पण या प्रस्तावावरून आता पाकिस्तानने अमेरिकेची जाहीर फजिती केली आहे. दुसरीकडे, इराणनेही या अटी फेटाळून लावत अमेरिकेला आरसा दाखवला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे ते म्हणजे ‘तेल’ आणि जगाची सर्वात महत्त्वाची नस असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’.

पाकिस्तानची ‘बॅटिंग’ आणि अमेरिकेची खिल्ली

पाकिस्तानला सहसा अमेरिकेचा मित्र मानले जाते, पण यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वॉशिंग्टनच्या बदलत्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे. आसिफ यांच्या मते, अमेरिकेचा शांतता प्रस्ताव हा जगाच्या कल्याणासाठी नसून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेला आता लोकशाही किंवा युद्धाचा अंत यात रस नाही, तर त्यांना फक्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारे स्वस्त तेल हवे आहे.” अमेरिकेची ही ‘तेल-नीती’ आता जगासमोर उघडी पडली असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

होर्मुझची सामुद्रधुनी: जगाची लाईफलाईन धोक्यात!

होर्मुझची सामुद्रधुनी हा असा जलमार्ग आहे जिथून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र, इराणने या मार्गावर आपला ‘होल्ड’ इतका घट्ट केला आहे की, जागतिक व्यापार अक्षरशः कोलमडला आहे. ‘लॉयड्स लिस्ट’च्या आकडेवारीनुसार, या मार्गावरून दररोज सरासरी १२० जहाजे प्रवास करतात. पण १ ते २५ मार्च २०२६ या काळात या मार्गावरून केवळ १५५ जहाजे गेली आहेत. म्हणजेच व्यापारात तब्बल ९५ टक्क्यांची ऐतिहासिक घट झाली आहे. हीच ती बाब आहे ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था हादरली असून ट्रम्प यांना घाईघाईने शांतता प्रस्ताव मांडावा लागला आहे.

इराणचा प्रति-प्रहार: १५ कलमे फेटाळली!

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या १५-कलमी प्रस्तावात इराणच्या अणुकार्यक्रमावर बंदी आणि होर्मुझ खुले करण्याच्या अटी होत्या. पण इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत स्वतःच्या अटी मांडल्या आहेत. इराणचे म्हणणे आहे की, “जर शांतता हवी असेल तर आधी युद्धातील नुकसानीची भरपाई द्या, आमच्या नेत्यांच्या हत्या थांबवण्याचे लेखी आश्वासन द्या आणि होर्मुझवर इराणचेच नियंत्रण राहील हे मान्य करा.” इराणच्या या ठाम भूमिकेमुळे अमेरिकेची शांती योजना प्राथमिक स्तरावरच अडकली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: मोठा दिलासा! अखेर इराणने होर्मुझचं दार उघडलं; भारत आणि ‘या’ देशांना LPG आणि Oil नेण्यासाठी फ्री एन्ट्री

पुढे काय होणार?

सध्याची परिस्थिती पाहता, अमेरिका युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी उतावीळ आहे, कारण तेलाच्या वाढत्या किमती ट्रम्प यांच्यासाठी देशांतर्गत डोकेदुखी ठरत आहेत. मात्र, इराण आता पूर्णपणे आक्रमक झाला असून तो कोणत्याही दबावाखाली वाकण्यास तयार नाही. पाकिस्तानसारख्या देशाने उघडपणे अमेरिकेची खिल्ली उडवणे हे दर्शवते की, जागतिक राजकारणात अमेरिकेचा प्रभाव कमी होत असून इराणचा ‘ऑईल गेंम’ यशस्वी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने अमेरिकेवर काय टीका केली आहे?

    Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अमेरिकेला युद्ध थांबवण्यात रस नाही, तर त्यांना फक्त इराणने रोखलेले तेल हवे आहे.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारात किती घट झाली आहे?

    Ans: इराणच्या नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीत ९५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

  • Que: इराणने अमेरिकेचा शांतता प्रस्ताव का फेटाळला?

    Ans: इराणच्या मते अमेरिकेच्या अटी एकतर्फी आहेत. इराणला युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि आपल्या नेत्यांच्या सुरक्षेचे लेखी आश्वासन हवे आहे.

Web Title: Pakistan defence minister mocks us iran rejects trump 15 point plan hormuz trade drop 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ
1

US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके
2

World War 3 : अमेरिकेचे ‘सुरक्षा कवच’ अयशस्वी! 6 अमेरिकन सैनिकांचा बळी; कुवेत ते कतारपर्यंत अमेरिकन तळांचे तोडले ‘असे’ लचके

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
3

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?
4

World Politics: मला दुसरं काम आहे, युद्ध लवकर संपवा! ट्रम्पच्या एका फोनने सर्वांच्याच मनात उठले भीतीचे काहूर; नेमकी कशाची चाहूल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.