Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

India Lockdown Again News : सध्याची परिस्थिती चिंताजनक असून भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि देशातील नागरिकांवर दूरगामी परिणाम होतील. पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 26, 2026 | 11:56 AM
भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं 'ते' वक्तव्य अन् ...; काय आहे सत्य? (फोटो सौजन्य-ChatGPT)

भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं 'ते' वक्तव्य अन् ...; काय आहे सत्य? (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने
  • मोदी नेमकं काय म्हणाले?
  • पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती
India Lockdown Again News In Marathi : अमेरिका आणि इराणच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, भारतात लॉकडाऊन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील कोरोना विषाणूच्या उल्लेखाचा अर्थ सोशल मीडियावर लॉकडाऊनचा संकेत म्हणून लावला जात आहे. देश एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) च्या संकटाचा सामना करत असतानाच या चर्चा होत आहेत.

IRCTC Fined: निकृष्ट अन्न पुरवठ्याप्रकरणी भारतीय रेल्वेची मोठी कारवाई! IRCTC ला १० लाख, तर पुरवठादाराला ५० लाखांचा दंड

काय आहे नेमके दावे?

गौरव तोमर नावाच्या एका युजर्सने इंस्टाग्रामवर लिहिले, “इंधनाचे संकट असेल तर मोदीजी लॉकडाऊन लावू शकतात का?” त्याने पंतप्रधान मोदी सभागृहात बोलत असल्याचा एक फोटोही शेअर केला. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले, “भारतात आणखी एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे…” सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट आहेत, ज्यामुळे लॉकडाऊनबद्दलच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत युद्धावर भाषण दिले. यावेळी भाषणात सांगितले की, या संकटाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल आणि कोविड-१९ च्या संकटाप्रमाणेच नागरिकांना त्याचा सामना करावा लागेल. तसेच “या युद्धामुळे जगात निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तयार राहिले पाहिजे, आपण एकजूट राहिले पाहिजे. कोविड-१९ महामारीच्या काळात आपण अशा आव्हानांना एकजुटीने तोंड दिले आहे. आता, आपल्याला पुन्हा तयार राहण्याची गरज आहे. आपण प्रत्येक आव्हानाला संयम, सहनशीलता आणि शांत मनाने सामोरे गेले पाहिजे.”

पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, जी तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे, तिने भारतासमोर आर्थिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवी सुरक्षेशी संबंधित अभूतपूर्व आव्हाने उभी केली आहेत. “या संकटासंदर्भातील संदेश भारतीय संसदेतून एकमताने आणि एकजुटीने जगापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.”

विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या भाषणात कुठेही ‘लॉकडाऊन’ हा शब्द वापरला नाही. शिवाय, सरकारने देशात कोणतेही सार्वजनिक निर्बंध जाहीर केलेले नाहीत. या संदर्भात सोशल मीडियावरच्या पोस्ट केवळ अफवा आहेत.

जेव्हा भारतात लॉकडाऊन…

२४ मार्च २०२० रोजी, पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. देशात कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या ५०० च्या पुढे गेल्यानंतर हा खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने लॉकडाउनचे उपाय लागू केल्यामुळे, जगभरातील २.६ अब्जाहून अधिक लोक निर्बंधांखाली आले.

Middle East War : ‘आम्ही दलाल नाही…’, पश्चिम आशियातील तणावावर भारताची स्पष्ट भूमिका; पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर टीका

Web Title: Iran america war lockdown again in india pm modi speech sparks nationwide speculation pm mentions covid preparedness news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • narendra modi
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक
1

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
2

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये  Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?
3

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
4

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.