
pakistan drone intrusion rajouri samba indian army firing weapon seized 2026
Pakistan drone intrusion Jammu Kashmir 2026 : थंडीचा कडाका आणि दाट धुक्याचा फायदा घेत पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय सीमा (IB) आणि नियंत्रण रेषेवर (LoC) संशयास्पद ड्रोनच्या हालचालींमुळे खळबळ उडाली. भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा घुसखोरीचा आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याचा कट उधळला गेला असून, सध्या संपूर्ण सीमाभागात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये संध्याकाळी ६:३५ च्या सुमारास सीमेवरील गनिया-कलसियान गावावर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसले. ड्रोनचा आवाज आणि त्यावर असलेले लुकलुकणारे दिवे पाहून भारतीय जवानांनी त्वरित पोझिशन घेतली. ड्रोन भारतीय हद्दीत अधिक खोलवर घुसण्यापूर्वीच लष्कराने मशीन गनने त्यावर गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा कडाका पाहून पाकिस्तानी ड्रोनने पुन्हा सीमा ओलांडून पळ काढला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PSLVC62: ISROचे देशाच्या सीमा सुरक्षा उपग्रहाचे स्वप्न भंगले; तिसऱ्या टप्प्यातील ‘त्या’ तांत्रिक बिघाडामुळे घात, मिशन अयशस्वी
केवळ नौशेराच नाही, तर सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमधील चक बाबरल गावावरही ७:१५ वाजता एक ड्रोन काही मिनिटे घिरट्या घालत होते. हे ड्रोन नेमक्या कोणत्या उद्देशाने आले होते, याचे लष्करी तज्ज्ञ विश्लेषण करत आहेत. त्याच वेळी पूंछच्या मानकोट सेक्टरमध्येही संध्याकाळी ६:२५ वाजता ड्रोन सदृश वस्तू ताईनहून टोपाच्या दिशेने उडताना दिसली. या सर्व हालचाली पाकिस्तानच्या नव्या हाय-टेक युद्धाचा भाग असल्याचे मानले जात आहे.
जम्मू-कश्मीर के सांबा, राजौरी और पुंछ जिलों में रविवार शाम को अंतरराष्ट्रीय सीमा (आईबी) और नियंत्रण रेखा (एलओसी) से सटे कई अग्रिम क्षेत्रों में सुरक्षा बलों ने संदिग्ध ड्रोन की गतिविधि देखी. सूत्रों के मुताबिक जम्मू के राजौरी जिले के नौशेरा सेक्टर में सेना ने भी फायरिंग की.… pic.twitter.com/WgMB0Mae21 — ABP News (@ABPNews) January 11, 2026
credit : social media and Twitter
या ड्रोन घुसखोरीचे गांभीर्य तेव्हा अधिक वाढले जेव्हा सांबा जिल्ह्यातील घागवाल भागातील पलौरा गावात सुरक्षा दलांना ड्रोनने टाकलेला शस्त्रसाठा सापडला. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दोन अत्याधुनिक पिस्तूल, तीन मॅगझिन, १६ जिवंत काडतुसे आणि एक शक्तिशाली ग्रेनेड सापडला आहे. दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तान या ‘ड्रोन एअरलिफ्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : जगाचा नकाशा बदलणार? NATOने केले बंड; Greenlandसाठी जर्मनी मिलिटरी युद्धसज्ज, ट्रम्प मात्र अस्वस्थ
ड्रोन दिसल्याच्या ठिकाणांनजीक काही संशयास्पद वस्तू तर टाकण्यात आल्या नाहीत ना, याचा शोध घेण्यासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम (Search Operation) सुरू केली आहे. कालाकोट, तेरियाथ आणि धर्मशाल या दुर्गम भागात ड्रोनच्या हालचाली अधिक असल्याने तिथे विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सीमेवरील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही संशयास्पद वस्तूची माहिती तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ans: मुख्यत्वे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ (ड्रग्ज) पुरवण्यासाठी आणि भारतीय लष्करी तळांची हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान या ड्रोनचा वापर करतो.
Ans: नौशेरामध्ये ड्रोन दिसताच भारतीय लष्कराच्या जवानांनी मशीन गनने गोळीबार केला, ज्यामुळे ड्रोनला पळ काढावा लागला.
Ans: सांबा येथील पलौरा गावातून ड्रोनने टाकलेले २ पिस्तूल, ३ मॅगझिन, १६ काडतुसे आणि १ ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.