Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणीनंतर गव्हर्नर हाऊस पेटवले; पोलिसांचा थेट गोळीबार, स्थिती हाताबाहेर

Pakistan Emergency : आणीबाणीविरोधातील आंदोलनांदरम्यान पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील गव्हर्नर हाऊसमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. पीटीआय कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे राजकीय तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 12, 2026 | 03:20 PM
Khyber Pakhtunkhwa Emergency Imran Khan PTI protest Khyber Pakhtunkhwa

Khyber Pakhtunkhwa Emergency Imran Khan PTI protest Khyber Pakhtunkhwa

Follow Us
Follow Us:
  • केपी प्रांतात भीषण हिंसाचार आणि जाळपोळ
  • नेते व कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई
  • आणीबाणीविरोधात निदर्शने व हिंसाचार

पाकिस्तानमधील (Pakistan Emergency) राजकीय अस्थिरता आणि हिंसक चकमकींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शाहबाज शरीफ यांच्या केंद्र सरकारने खैबर पख्तुनख्वा (KP) प्रांतात आणीबाणी (राज्यपाल राजवट) जाहीर केल्यानंतर संपूर्ण प्रांतात मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. संतप्त आंदोलकांनी थेट पेशावर येथील गव्हर्नर हाऊसला लक्ष्य करत त्याला आग लावून दिल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये गव्हर्नर हाऊसचे इमारत परिसर आगीच्या प्रचंड ज्वालांमध्ये वेढलेले दिसत असून प्रांतातील विविध शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

गव्हर्नर हाऊसला आग, आणीबाणीनंतर स्थिती हाताबाहेर 

केंद्रातील शाहबाज शरीफ सरकारने खैबर पख्तुनख्वामधील पीटीआय (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) पक्षाचे प्रांतीय सरकार बरखास्त करून आणीबाणी लादल्याने हा भडका उडाला. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी आणि पीटीआय कार्यकर्त्यांनी रविवारी प्रांतातील प्रमुख शहरांमध्ये निदर्शने करत महामार्ग रोखून धरले. आंदोलन पांगवण्यासाठी आणि राजकीय रोष शमवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था दलांनी थेट गोळीबार आणि अश्रूधुराचा वापर केला, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू

पीटीआय नेत्यांची धरपकड आणि माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैद

आणीबाणी लागू होताच सरकारी यंत्रणांनी पीटीआय पक्षाच्या नेतृत्वावर मोठी कारवाई सुरू केली आहे. पीटीआयचा इस्लामाबाद येथील नियोजित भव्य मोर्चा विस्कळीत करण्यात आला असून स्वाबी जिल्ह्यातून ५९ आणि खैबर जिल्ह्यातून ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत प्रांताचे पदच्युत मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि पीटीआयचे प्रांतीय प्रमुख जुनैद अकबर यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

🚨 BREAKING: Martial law reportedly imposed in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa (KPK). The Governor’s House has reportedly been set on fire amid escalating unrest. 🇵🇰 https://t.co/js1NeVKvjE — Ary Sangwan (@Arysangwan) October 12, 2026

credit – social media and Twitter

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी आपल्याला डेरा इस्माईल खान येथील निवासस्थानी बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. संपूर्ण खैबर पख्तुनख्वा प्रांतात इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि पीटीसीएल ब्रॉडबँड पूर्णपणे खंडित करण्यात आले आहे, जेणेकरून आंदोलकांना एकत्र येण्यापासून रोखता येईल. मात्र, यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भीतीचे सावट पसरले आहे.

विरोधी पक्षांचा हल्लाबोल: ‘लोकशाहीवर थेट दरोडा’

शाहबाज शरीफ सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानमधील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी आणि मानवाधिकार संघटनांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पीटीआय पक्षाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, निवडून आलेल्या लोकशाही सरकारला पाडणे आणि राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करणे हा लोकशाहीवरील थेट दरोडा आहे. हा निर्णय एक अत्यंत धोकादायक पायंडा पाडणारा असून प्रांतातील जनतेचा कौल दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पीटीआयच्या समर्थकांनी आणि नेत्यांनी अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि जुनैद अकबर यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या अटकेची कायदेशीर कारणे, विशिष्ट आरोप आणि न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया त्वरित सार्वजनिक करावी, असे आवाहन पक्षाने केले आहे. तसेच या अन्यायाविरोधात कायदेशीर मार्ग आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून तीव्र लढा देण्याची शपथ पीटीआयने घेतली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Riyadh Airport: कुणी विश्रांती घेत होते तर कुणी वाट पाहत होते, क्षणात बदलले चित्र; रियाध विमानतळावरील हल्ल्याचा VIDEO VIRAL

आगीत झालेले नुकसान आणि भविष्यातील संकट

गव्हर्नर हाऊसमधील आगीच्या तीव्रतेमुळे इमारतीचे नेमके किती नुकसान झाले आहे आणि यात कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबत प्रशासनाकडून अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून प्रसारमाध्यमांवरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना खैबर पख्तुनख्वामधील हा राजकीय उद्रेक देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करू शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. येत्या दिवसांत ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे असून जगाचे लक्ष आता पाकिस्तानमधील घडामोडींवर लागले आहे.

Web Title: Pakistan khyber pakhtunkhwa emergency governor house fire pti protest hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Emergency Situations
  • pakistan army
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू
1

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू; शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान संघर्षात नवी ठिणगी
2

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू; शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान संघर्षात नवी ठिणगी

Emergency Fund ठेवायचा कुठे? FD, Savings की Liquid Fund; कोणता पर्याय ठरेल योग्य?
3

Emergency Fund ठेवायचा कुठे? FD, Savings की Liquid Fund; कोणता पर्याय ठरेल योग्य?

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त
4

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.