Pakistan news Anti-government police officers took to the streets in PoK, what is the reason
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये सैनिकांनी सरकारविरोधात बंड पुकारला आहे. 80 हजार सैनिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेची राजधानी मुझफ्रबादमध्ये शेकडो पोलिस कर्मचारी सरकारविरोधी बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी (22 जुलै) सैनिकांशी चर्चा करुन उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. परंतु या बैठकीत कोणताही सकारात्मक निकाल लागाला नाही.
पीओकेमधील कर्मचाऱ्यांनी सरकारला मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शनांची धमकी दिली आहे. २१ जुलैपासून हा संप सुरु करण्यात आला आहे. यामुळे पीओकेच्या सरकारची चिंता वाढत चालली आहे. मात्र हे सैनिक नेमके कोणत्या कारणावरुन बंड पुकारत आहेत?
पीओके प्रातांचे आयजी अब्दुल जब्बार यांनी आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांचे आंदोलन शिस्तीचे उल्लंघन करत असल्याचे आणि त्यांना कमकुवत करत असल्याचे जब्बार यांनी म्हटले आहे. मंगळवारी पोलिस संघटनांची बैठक देखील घेण्यात आली. मात्र या बैठकीत सैनिकांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. याउलट निर्शक पोलिसांना संप थांबवण्यास सांगितले.
सध्या या निदर्शनांनी तीव्र वळण घेतले आहे. पोलिस कर्मचारी, आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. दरम्यान ३ जुलैपासून पूर्ण संपावर जाण्याचाही इशारा सरकारला देण्यात आला आहे.