Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान हादरले! बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 8 जवान ठार 40 हून अधिक जखमी

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये 4 जानेवारी 2025 मोठा आत्मघाती हल्ला झाला असून न्यू बहमन परिसरात कराचीहून तुबर्तकडे जाणाऱ्या एका बसला लक्ष्य केले. यामध्ये पाकिस्तानच्या 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2025 | 11:24 AM
पाकिस्तान हादरले! बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 8 जवान ठार 40 हून अधिक जखमी

पाकिस्तान हादरले! बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 8 जवान ठार 40 हून अधिक जखमी

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये काल (4 जानेवारी 2025) मोठा आत्मघाती हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली आहे. न्यू बहमन परिसरात कराचीहून तुबर्तकडे जाणाऱ्या एका बसला लक्ष्य करण्यात आले. या स्फोटामनुळे बस जळून पूर्ण खाक झाली. यामध्ये पाकिस्तानच्या 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोठ्या संख्येने जवानांचा समावेश आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी 

या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बुलिस्तानच्या पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीहून कराचीहून तुर्बतकडे जाणारी बस न्यू बहमन भागात स्फोटामुळे उद्ध्वस्त झाली. स्फोटानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बल आणि पोलीस तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसरात तातडीने बंदोबस्त करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्रह्मपुत्रा डॅम प्रल्पावर भारताची चिंता व्यक्त; चीनचे स्पष्टीकरण म्हणाला, ‘नुकसान…

क्वेटा SSP कुटुंब देखील स्फोटात अडकले

क्वेटा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) जोहैब मोहसिन हे स्वतः आपल्या कुटुंबासह तुर्बतकडे प्रवास करत असताना या स्फोटात अडकले. या घटनेत जोहैब मोहसिन आणि त्यांचे चार कुटुंबीय किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने स्थानिक प्रशासन हादरले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री मीर सरफराज बुगतींचा निषेध

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या भयानक हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, “निर्दोष लोकांना लक्ष्य करणारे लोक मानवतेचे शत्रू आहेत. ते माणूस म्हणवून घेण्याच्या लायक नाहीत.” त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली असून जखमींच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली.

घटनास्थळावर तपास सुरू

हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. स्फोटामागील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. बलुचिस्तान सरकारने या हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. हा हल्ला पाकिस्तानमधील वाढत्या अस्थिरतेचे प्रतीक असून, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काय आहे H-1B व्हिसा विवाद? ट्रम्प समर्थकांमध्ये राजकीय व सामाजिक संघर्ष सुरू, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Pakistan news at least 8 killed over 40 injured in balochistan bomb bus attack nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.