ब्रह्मपुत्रा डॅम प्रल्पावर भारताची चिंता व्यक्त; चीनचे स्पष्टीकरण म्हणाला, 'नुकसान...( फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
नवी दिल्ली: चीनने तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्र) नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेगा हायड्रोपॉवर प्रकल्पावर अनेकांनी विरोध केला. दरम्यामन भारताने देखील या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली आहे. भारताचे म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे नदीच्या खालच्या प्रवाहातील देशांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय, भारतासह बांगलादेशने देकील चीनच्या या प्कल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, चीनने या प्रकल्पावर आपली भूमिका मांडत कोणतेही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.
चीनने म्हटले आहे की, हा प्रकल्प दीर्घकालीन अभ्यासानंतर तयार करण्यात आला आहे. तसेच पर्यावरणीय सुरक्षा लक्षात घेऊन हा प्रक्लप सुरु करण्यात आला आहे. नदीच्या खालच्या प्रवाहातील देशांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची आम्ही हमी देतो. या प्रकल्पाच्या अनुषंगाने भारत व चीन यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेची चीनच्या प्रक्लपावर टीका
भारताच्या संदर्भात, अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनच्या या प्रकल्पांवर टीका केली आहे. अमेरिकेने नमूद केले आहे की, चीनकडून इतर देशांच्या सीमाभागांतून वाहणाऱ्या नद्यांवर मोठे धरणे बांधण्यात येत आहेत यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण होऊ शकते. तसेच खालच्या प्रवाहातील देशांना जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत अडचणी येऊ शकतात.
चीनची प्रतिक्रिया
तर चीनच्या दूतावासाने स्पष्ट केले की, चीन नेहमीच सीमा ओलांडून जाणाऱ्या नद्यांच्या विकासासाठी जबाबदार राहिला आहे. त्यांनी पर्यावरणीय सुरक्षा आणि शेजारील देशांच्या हितसंबंधांना प्राधान्य देत प्रकल्प राबवण्याचा दावा केला आहे. मात्र, भारत आणि बांगलादेश या प्रकल्पावर आपली चिंता कायम राखत आहेत, ज्यामुळे या प्रकरणावर आगामी काळात जागतिक पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिका-भारत भेट
वॉशिंग्टनच्या अहवालानुसार, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन 5-6 जानेवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असतील. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. जेक सुलिवन त्यांच्या भारत भेटीत भारत-अमेरिका संबंधांतील द्विपक्षीय सहकार्याबाबतही चर्चा करतील.
व्हाइट हाउसने त्यांच्या भेटीची अधिकृत घोषणा केली आहे. या भेटीदरम्यान अमेरिका व भारत यांच्यात या प्रकल्पाविषयी संयुक्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असेही नमूद केले की, इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनने बांधलेले अनेक अपस्ट्रीम धरणे पर्यावरणीय नुकसान आणि जलवायू बदलांवर परिणाम करू शकतात.