Government issues guidelines for Indian students after crackdown on Hamas supporters
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नोशकी जिल्ह्यात बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हलल्यामुळे पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने मोठ्या प्रमाणात विध्वंस घातला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यात चार सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र टोळ्यांनी पोलिसांच्या गस्ती व्हॅनला घेरले आणि गोळीबार केला. या हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून हल्लेखोरांचा अद्याप पत्ता नाही.
बलुचिस्तानच्या कलाट जिल्ह्यातही बुलच बंडखोरांनी शनिवारी (22 मार्च) पंजाबमधील चार कामगारांची गोळ्या घालून हत्या केली आहे. स्थानिक जमीनदारांसाठी ट्यूबवेल खोदण्याचे काम हे कामगार करत होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.या क्रूर हल्ल्यात सर्व कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोर पसार झाले.
गेल्या काही दिवसांपासून बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात हल्ला केले आहेत. गेल्या आठवड्यात बंडखोरांनी क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. बोलान भागात झालेल्या या हल्ल्यात 400 हून अधिक प्रवासी अडकले होते. मात्र, पाकिस्तानी लष्कराने 33 सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे आणि 300 हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 37 जखमी प्रवाशांसह एकूण 354 ओलीसांची सुटका करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
11 मार्च रोजी जाफर एक्स्प्रेस क्वेटाहून पेशावरसाठी रवाना झाली होती. या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ट्रेन बोलानच्या टेकड्यांमधून जात असताना, एका बोगद्यात घात लावून बसलेल्या बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी ट्रेनवर जोरदार हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 21 प्रवाशांचाही समावेश आहे.
बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानविरोधी कारवाया सातत्याने वाढत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अन्य स्थानिक संघटनांनी पाकिस्तानविरोधात संघर्ष उभा केला आहे. पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले होत असून, बलुच लिबरेशन आर्मीच्या या हालचालींमुळे पाकिस्तान सरकार अडचणीत आले आहे.
पाकिस्तानी लष्कर आणि सरकार या परिस्थितीला कसे हाताळतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, बलुचिस्तानमधील वाढता संघर्ष आणि हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेवर मोठे संकट निर्माण झाले आहे.