Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : PoK बंडावर झैद हमीदचा इशारा; भारत PoK ताब्यात घेणार?

Pakistan News : विवादास्पद नेते झैद हमीद यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवर संताप व्यक्त केला असून, हिंसाचार न थांबल्यास भारतीय लष्कर त्या भागाचा संपूर्ण ताबा घेईल, असा इशारा दिला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 04, 2026 | 06:02 PM
Jaid Hameed

Jaid Hameed

Follow Us
Follow Us:
  • आंदोलकांविरुद्ध संताप उसळला
  • भारतीय लष्कराची भीती
  • गाझासारख्या कारवाईची मागणी
  • आंदोलनांच्या मुख्य मागण्या
Pakistan News : गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये स्थानिक रहिवासी थेट सरकार आणि पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत आहेत. दरम्यान, या अशांततेमुळे पाकिस्तानातील उजव्या विचारसरणीच्या गटांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे. झैद हमीद , लाल टोपी म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानी कार्यकर्ते  यांनी या संकटावर एक वादग्रस्त विधान केले आहे.

Gaza News : युद्धानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार; गाझामध्ये ११२ जणांना अखेर मिळणार अंतिम निरोप

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, झैद हमीद यांनी आंदोलकांना घृणास्पद, लज्जास्पद आणि पूर्णपणे कृतघ्न संबोधून त्यांच्यावर शिवीगाळ केली आहे. हमीद यांचा दावा आहे की, जर ही आंदोलने थांबली नाहीत, तर भारतीय सैन्य त्या भागाचा ताबा घेईल. ते म्हणतात की, या परिस्थितीनंतरच तेथील लोकांना पाकिस्तानी सैन्याचे महत्त्व कळेल.

आंदोलकांविरुद्ध संताप उसळला

झैद हमीदने आंदोलकांवर आपला संताप व्यक्त केला आणि कठोर शिक्षेची मागणी केली. ऑडिओमध्ये तो असे बोलताना ऐकू आला की, या लोकांविरुद्ध बळाचा आणि कठोरतेचा वापर करणे आवश्यक आहे. तो म्हणाला की, आंदोलकांना हिंसेच्या माध्यमातून पाकिस्तान आणि त्याच्या सैन्याचा आदर करायला शिकवले पाहिजे. त्याच्या मते, या बेबंद आंदोलकांना फक्त भीती आणि दडपशाहीची भाषा समजते. यांच्यासोबत मवाळ भूमिका घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे ही त्याचे मत आहे असे मिळालेल्या माहितीवरून समजते .

गाझासारख्या कारवाईची मागणी

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये, झैद हमीद अमानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना आपल्याला ऐकू येतो . त्याने मागणी केली की पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरला इस्रायल आणि गाझाच्या पातळीवर आणावे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या आंदोलकांना देशद्रोही घोषित केले आहे. सरकारने हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी लष्कराला विरोध करणाऱ्यांशी कोणतीही वाटाघाटी होणार नाही.

World News : ११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार ? स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पाकिस्तानची वाढली चिंता

भारतीय लष्कराची भीती

हमीद म्हणाले की, भारतीय लष्कराने रावलकोटसारख्या आंदोलनाच्या भागांवर नियंत्रण मिळवावे. भारतीय लष्कराने त्यांना योग्य धडा शिकवल्यानंतरच त्यांना त्यांच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल. त्यानंतर ते पुन्हा पाकिस्तानी लष्कराकडे मदतीसाठी आवाहन करतील. त्यांनी असा इशारा दिला की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.

आंदोलनांच्या मुख्य मागण्या

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही आंदोलने संयुक्त आवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सातत्याने आयोजित केली जात आहेत. निर्वासितांसाठी राखीव जागा रद्द करणे आणि बेरोजगारी व महागाईला आळा घालणे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच, काश्मिरींसाठी अधिक हक्क आणि न्याय्य आर्थिक धोरणांचीही त्यांची मागणी आहे. आतापर्यंत झालेल्या भीषण हिंसाचार आणि पोलीस गोळीबारात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title: Pakistan news zaid hamid warns of an uprising in pok will india take control of pok

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • pakistan army
  • Pakistan News
  • POK

संबंधित बातम्या

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
1

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Imaan Mazari Rearrest : दहशतवादविरोधी न्यायालयात काय घडले? इमान माझारी प्रकरणात पाकिस्तानातील राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश
2

Imaan Mazari Rearrest : दहशतवादविरोधी न्यायालयात काय घडले? इमान माझारी प्रकरणात पाकिस्तानातील राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
4

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.