Pakistan PM Sharif to visit Tajikistan
दुशान्बे : भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष निवळला आहे. परंतु दोन्ही देशात राजनैतिक तणाव अद्यापही आहेच. याच तणावादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या मुस्लिम राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शाहबाज यांनी तुर्की, इराण आणि अझबैजानला भेट दिली आहे. तसेच ताझाकिस्तानलाही भेट दिली आहे. या दौऱ्याचा उद्देश भारताशी तणावादरम्यान पाकिस्तानला साथ देणाऱ्या देशांचे आभार मानणे आणि त्यांच्याशी धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे आहे. या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानने इराणला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आता यामध्ये ताजिकिस्तानलाही सामील केले आहे.
तसे पाहायला गेले तर ताजिकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये फारसे संबंध नाहीत. पण दोन्ही देश एकमेकांचे शत्रू देखील नाहीत. तसेच अफगाणिस्तान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान घाबरलेला आहे. यामुळे पाकिस्तानने शेजारी देशांशी संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ताजिकिस्तानलाही आपल्या बाजूने ओढण्याचा शाहबाज यांनी प्रयत्न केला आहे. ताजिकिस्तान हा तालिबानचा शत्रू देश आहे. यामुळे पाकिस्तानच्या ISI ने तालिबानविरोधात ताजिकिस्तानमध्ये बैठक घेतली होती. यामुळे हळूहळू पाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये संबंध वाढत चालले आहे. सध्या शाहबाज ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत.
ताजिकिस्तानने भारताच्या नकळत पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. पारकिस्तानने देखील ताजिकिस्तानला भारतविरोधी डिप्लोमॅटिक गेममध्ये सामील करुन घेतले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानल एकटा पडला होता. मात्र आता , तुर्की, अझबैजान, ताजिकिस्तान पाकिस्तानच्या समर्थनार्थ येत आहेत. दरम्यान इराण देखील भारताच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.
शाहबाज शरीफ यांचा हा दौरा भारतासाठी धोकादायक मानला जात आहे. हळूहळू एक एक मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत आहे. या देशांना कायमस्वूरपी भारताच्या विरोधात ठेवण्याचा पंतप्रधान शाहबाज यांचा प्रयत्न सुरु आहे. शाहबाज यांनी मोठा डिप्लोमॅटिक गेम केला आहे. यामुळे पाकिस्तानची लष्करी ताकद, आर्थिक, आणि राजनैतिक ताकद मजबूत होत आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात सिंधू दल करारावर कडक भूमिका घेतली आहे. पण पाकिस्तान मात्र विरोधाच्या सूर चढवत आहे. पाकिस्ताच्या पंतप्रधानांचा हा दौरा एक मोठी चाल आहे. एक डिप्लोमॅटिक खेळी आहे. यामुळे भारतासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पण भारताने प्रत्येक वेळी आपली बाजू शांततेन मांडली आहे. तसेच शत्रूंवर नेहमीच योग्य ती कारवाई केली आहे.