
pakistan pm shehbaz sharif admits begging for loans economic crisis 2026
Pakistan economic crisis news 2026 : दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि भारताशी (India) वैर घेणारा पाकिस्तान (Pakistan) आज आपल्या अस्तित्वासाठी जगासमोर हात पसरत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच एक अशी कबुली दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगात पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. “आम्हाला देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि आयएमएफ (IMF) कडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक देशांपुढे हात पसरावे लागले, अक्षरशः भीक मागावी लागली,” असे सांगताना शाहबाज शरीफ यांचा आवाज थरथरत होता.
इस्लामाबादमध्ये देशातील बड्या निर्यातदारांशी संवाद साधताना शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या भीषण परिस्थितीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, “गेल्या काही महिन्यांपासून आमची स्थिती इतकी बिकट झाली होती की, आम्हाला अनेक देशांकडे ‘शांतपणे’ जाऊन मदत मागावी लागली. अनेकदा आम्हाला आमचा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांच्यासमोर माथा टेकवावा लागला. कर्ज देणाऱ्यांच्या अटी कधीकधी इतक्या अन्यायकारक होत्या की त्या स्वीकारताना आम्हाला प्रचंड यातना झाल्या, पण देशासाठी आम्हाला ते करावं लागलं.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: रविवारी इराणवर बॉम्बवर्षाव? अमेरिकेचा ‘फायनल वॉर्निंग’ नंतर मोठा निर्णय; ट्रम्प सरकार तेहरान उलटवून टाकण्याच्या तयारीत
विशेष म्हणजे, या ‘भीक’ मागण्याच्या मोहिमेत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे देखील पंतप्रधानांच्या सोबत होते. शरीफ यांनी सांगितले की, केवळ लष्करी ताकद असून चालत नाही, तर पोटाची भूक भागवण्यासाठी लष्करप्रमुखांनाही परदेशी नेत्यांच्या भेटी घ्याव्या लागल्या. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा (Foreign Exchange Reserves) संपण्याच्या मार्गावर असल्याने, सौदी अरेबिया, यूएई आणि चीनसारख्या देशांकडे वारंवार विनंत्या कराव्या लागल्या.
🚨 #BreakingNews पाकिस्तान पीएम की खुली स्वीकारोक्ति, हालात भिखारी जैसे 🗣️ 🇵🇰पाकिस्तान के प्रधानमंत्री शहबाज़ शरीफ़ ने खुद माना:
“फील्ड मार्शल और मैं कई देशों में डॉलर मांगने गए। जब कोई देश मदद मांगता है तो उसकी क़ीमत आत्मसम्मान से चुकानी पड़ती है और कई बार बेबुनियाद शर्तें भी… pic.twitter.com/4ZoWxCkCH0 — Madhurendra kumar मधुरेन्द्र कुमार (@Madhurendra13) January 30, 2026
credit – social media and Twitter
शाहबाज शरीफ यांनी भावूक होत सांगितले की, “ज्या देशांकडे आम्ही कर्ज मागायला गेलो, त्यांनी आम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही, पण कर्ज घेणाऱ्याचे डोकं नेहमीच झुकलेले असते. आज आमची अवस्था अशी झाली आहे की, आमचे पारंपरिक मित्रही आता आम्हाला थेट रोख मदत देण्यास टाळाटाळ करत आहेत. ते आता कर्ज देण्याऐवजी व्यापाराच्या आणि गुंतवणुकीच्या अटी घालत आहेत.” याचा अर्थ असा की, आता जगात पाकिस्तानला कोणीही फुकट मदत करायला तयार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Nuclear Secret: इराणचा ‘अणू’ डाव! उद्ध्वस्त केंद्रांवर उभारली रहस्यमय छप्परं; अमेरिकेची झोप उडवणारा सॅटेलाईट फोटो आला समोर
डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानवर सुमारे ५२.३६६ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे ४.३५ लाख कोटी रुपये) परकीय कर्ज आहे. यामध्ये चीनचे कर्ज सर्वाधिक आहे. चीनने पाकिस्तानला आपल्या कर्जाच्या जाळ्यात (Debt Trap) असे अडकवले आहे की, पाकिस्तानला आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा केवळ व्याजाचे हप्ते भरण्यासाठी खर्च करावा लागत आहे. महागाईने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांना पीठ आणि विजेसाठी संघर्ष करावा लागत आहे.
Ans: शरीफ यांनी स्पष्टपणे नाव घेतले नसले तरी, पाकिस्तानने प्रामुख्याने चीन, सौदी अरेबिया, यूएई आणि आयएमएफ (IMF) कडे मदतीसाठी विनवणी केली आहे.
Ans: डिसेंबर २०२५ च्या अहवालानुसार, पाकिस्तानवर सुमारे ५२.३६६ अब्ज डॉलर्सचे बाह्य कर्ज आहे.
Ans: पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराचे वर्चस्व असल्याने, लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील आर्थिक मदतीसाठी परदेशांशी वाटाघाटी करत असल्याचे पंतप्रधानांनी मान्य केले आहे.