Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज

PTI Protest : पीटीआयचे कार्यकर्ते आणि समर्थक इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकारने इस्लामाबादमध्ये कंटेनर लावून बॅरिकेड्स लावले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 24, 2026 | 04:28 PM
PTI Islamabad protest September 27 Imran Khan news today

PTI Islamabad protest September 27 Imran Khan news today

Follow Us
Follow Us:
  • कंटेनर विरुद्ध बुलडोझर संघर्ष
  • लष्कर आणि सरकारची कडक भूमिका
  • २०२४ पेक्षा मोठ्या आंदोलनाची तयारी

पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, राजधानी इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI Protest) पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या सुटकेसाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक २७ सप्टेंबर रोजी राजधानी इस्लामाबादला घेराव घालणार आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने अभूतपूर्व पावले उचलली आहेत. संपूर्ण इस्लामाबाद शहराच्या सीमा २० हजारांहून अधिक शिपिंग कंटेनर्स लावून सील करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर हे कंटेनर हलवता येऊ नयेत म्हणून त्यांना एकमेकांशी वेल्डिंग करून जोडण्यात आले आहे.

दुसरीकडे, इम्रान खान यांच्या समर्थकांनी आणि पीटीआयच्या सैन्याने सरकारची ही तटबंदी उद्ध्वस्त करण्याची पूर्ण तयारी केली आहे. पाकिस्तानभरातून पीटीआय कार्यकर्ते भाड्याने बुलडोझर, क्रेन आणि अवजड यंत्रसामग्री गोळा करत आहेत. रस्ते अडवण्यासाठी लावलेले हे लोखंडी कंटेनर पाडण्यासाठी आणि रस्ता साफ करण्यासाठी या बुलडोझरचा वापर केला जाणार आहे. पीटीआय नेते नईम हैदर पंजुथा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “सरकारने संपूर्ण इस्लामाबाद बंद केले आहे, पण आम्ही ते उघडू. कोणत्याही परिस्थितीत आम्ही देशाची राजधानी बंद राहू देणार नाही.”

खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांचे नेतृत्त्व आणि ‘२०२४ पेक्षा मोठ्या आंदोलनाची’ आखणी

या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री करत आहेत. त्यांनी खैबर ते इस्लामाबाद अशी भव्य रॅली काढण्याची घोषणा केली असून हजारो समर्थक या यात्रेत सामील होत आहेत. पीटीआयच्या मते, हे आंदोलन २०२४ मध्ये झालेल्या आंदोलनापेक्षाही कितीतरी पटीने मोठे असेल. सरकारच्या अडथळ्यांना न जुमानता देशभरातून लाखो समर्थक इस्लामाबादच्या दिशेने कूच करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

पाकिस्तानच्या ‘डॉन’ या नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि लष्कराने पीटीआय नेत्यांना कडक इशारा दिला असून, त्यांनी इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना “धडा शिकवला जाईल” अशी धमकी दिली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे माहिती मंत्री अता तारार यांनी स्पष्ट केले आहे की, पीटीआय कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजधानीत पाऊल ठेवू दिले जाणार नाही. शहरात वैद्यकीय आणीबाणी घोषित करण्यात आली असून रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इम्रान खान तुरुंगात का आहेत? लष्कर विरुद्ध जनता संघर्ष तीव्र

ऑगस्ट २०२३ पासून इम्रान खान हे रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. २०२२ मध्ये लष्करी आणि राजकीय तख्तापलट झाल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात उघडपणे रान उठवले होते. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खटले दाखल करण्यात आले आणि त्यांना तसेच त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात टाकण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

सध्या इम्रान खान यांच्यावर कोर्टात केवळ एकच खटला प्रलंबित आहे, परंतु लष्कराच्या दबावामुळे न्यायालयीन प्रक्रियेला हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र शाहबाज शरीफ सरकारने न्यायालयाचा हा निर्णयही फेटाळून लावला. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या अहवालानुसार, इम्रान खान आजही पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय आहेत. जनता आसिम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या कथित बेकायदेशीर आणि दडपशाही राजवटीला कंटाळली असून, हे आंदोलन त्यांच्यासाठी बदलाचे आणि आशेचे नवे किरण ठरत आहे. २७ सप्टेंबरचा हा संघर्ष पाकिस्तानच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल.

Web Title: Pakistan protest pti imran khan supporters islamabad march containers bulldozers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Imran khan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
1

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
2

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.