भारताची चिंता वाढली; पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर रशियाचा भर, काय आहे नेमकं प्रकरण ?
मास्को: एकीकडे पाकिस्तानचे बांगलादेशाशी वाढत्या संबंधामुळे भारताची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे रशियाचे देखील पाकिस्तानशी संबंधांमध्ये सुधार होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. याच पार्श्व भूमीवर पाकिस्तान आणि रशियाने उर्झा प्रकल्प, तेल आणि वायू व्यापार यासाठी एक महत्तवपूर्ण करार केला आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी एका उच्चस्तरीय बैठकीत हा करार करण्यात आला आहे.
या बैठतीमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, शास्त्रीय आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी विशेषत: पाकिस्तान स्ट्रीम गॅस पाईपलाइन (PSGP) प्रकल्पासाठी रशियाने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल आणि वायूच्या शोधासाठी (ऑफशोअर ड्रिलिंग) सहकार्य करण्यावरही सहमती झाली आहे.
PSGP प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका
cइंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान स्ट्रीम गॅस पाईपलाइन प्रकल्प हा मोठ्या पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा एक भाग आहे. यामध्ये वायू पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि सस्त्या दरात गॅस पुरवठा सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे. तसेच रशियाची कंपनी ऑपरेशनल सर्व्हिसेस सेंटर पाकिस्तानला तेलाचा पुरवठा करत आहे आणि पुढेही हा पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, रशिया आणि पाकिस्तान यांनी तेल आणि वायू शोधण्यावर अधिक भर दिला आहे.
अनेक महत्त्वाचे करार
रशियाची आर्टेल कंपनीने पाकिस्तानमधील तेल आणि वायू बाजारासाठी इंडस्ट्रियल कम्युनिकेशन सिस्टीम पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, रशियाने पाकिस्तानला कोळसा आणि त्यासंबंधित रसायनिक उत्पादने निर्यात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या करारांमुळे रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संबंध दिसून आले आहेत. यामुळे तज्ञांनी रशिया आणि पाकिस्तानचे वाढते संबंध चिंतेचे कारण म्हटले आहे.
भारतासाठी चिंता वाढवणारे संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया आणि पाकिस्तानमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा सुरू आहेत, ज्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. अनेक तज्ज्ञ या वाढत्या सहकार्याकडे भारतासाठी धोक्याच्या दृष्टीने पाहत आहेत. गेल्या काही दशकांपासून रशिया भारताचा घनिष्ठ मित्र राहिला आहे. मात्र, आता पाकिस्तान आणि चीनसोबत त्याचे संबंध बळकट होताना दिसत आहेत.
यामुळे भारतासाठी चिंता वाढू शकते, विशेषतः जिथे पाकिस्तान आणि चीनचे सामरिक सहकार्य आधीच भारतासाठी आव्हान बनले आहे. तसेच बांगलादेशाशी देखील पाकिस्तानचे वाढते संबंध धोक्याचा इशारा आहेत. रशियाचा पाकिस्तानकडे वळणारा कल आणि चीनसोबतची जवळीक भारतासाठी एक कठीण स्थिती निर्माण करू शकते. यामुळे भारताला आपल्या परराष्ट्र धोरणात अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.