Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Shutdown : रात्री आठनंतर पाकिस्तानची बत्तीगुल! खायचे हाल अन् इंधन दर वाढ; इराण युद्धाचा जबरदस्त फटका

Pakistan Energy Crisis : कंगाल पाकिस्तान हाल आणखी बेहाल झाले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाची झळ पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. देशात मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे जनतेचे प्रचडं हाल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 12:34 PM
Shehbaz Sharif

Shehbaz Sharif

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये मोठे इंधन अन् उर्जा संकट
  • देशात आठनंतर सर्वकाही ठप्प
  • लोकांमध्ये भीतीचे वातावरण
Pakistan News in marathu : इस्लामाबाद : भारताचा शेजारी आणि शत्रू देश पाकिस्तान (Pakistan) डबघाईला आला आहे. मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धामुळे पाकिस्तानमध्ये मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरिय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनवंतर देशभरात अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सराकारने संपूर्ण देशासाठी वीज टंचाईमुळे नवी नियमावली जाहीर केली आहे.

Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार

रात्री ८ नंतर सर्व काही ठप्प

  • बाजापेठा बंद : सरकारच्या नव्या आदेशानुसार,पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) यांसारख्या विविध प्रदेशांमधील बाजारपेठा, मॉल्स आणि दुकाने रात्री ८ नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आळे आहे.
  • हॉटेल्स आणि रेस्टारंट, खानावळी, बेकरी रात्री १० पर्यंतच खुले राहणार आहेत.
  • याशिवाय वाढत्या वीज टंचाई आणि खर्चामुळे लग्नसमारंभांवरही बंदी घालण्यात आली आहे.
  • खैबर पख्तूनख्वामधील काही भागांनमध्ये रात्री ९ पर्यंतच बाजारपेठा खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

इंधन दर गगनाला भिडले

पाकिस्तानची जनता महागाई आणि आर्थिक ताणांचा सामना करत आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने इंधन दरांमध्ये प्रचंड वाढ जाहीर केली आहे. पेट्रोलचे दर सुमारे ४३ टक्क्यांनी वाढले आहेत, तर हाय-स्पीड डिझेलच्या दरा तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोल ४५८.४१ पाकिस्तानी रुपये प्रति लीटवर आहे, तर डिझेल ५२०.३५ रुपये प्रति लिटर झाले आहे.

लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम 

याशिवाय नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे पेशावर आणि खैबर पख्तुनख्वामधील सीएनजी स्टेशन्स बंद झाले आहे. यामुळे स्कूल व्हॅन आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे.  घरगुती गॅस आणि विजेच्या पुरवठ्यात कपातीमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मालवाहतुकीवरही परिणाम झाला असून पेट्रोल १६० प्रति लीटर लेव्ही आकारण्यात येत आहे. यामुळे सध्या पाकिस्तानी लोकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहेत. आधीच कंगाल असलेल्या पाकिस्तानचे आणखी कंबरडे मोडले आहे.

इराण युद्धाचा फटका

पाकिस्तान आपली बहुतांश इंधन गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. परंतु मध्यपूर्वेतील युद्धामुळे तेलाचे जहाज होर्मुझमध्ये अडकून पडले असून देशात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानला दरमहिन्याला १२ एलएनजी जहाजे मिळत होती, मात्र युद्धामुळे आता केवळ १-२ जहाजेच पाकिस्तानमध्ये पोहचत आहे. शिवाय आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानने अनुदाने बंदी केली असल्याचे महागाई वाढून आर्थिक बोझाही वाढला आहे.

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी

Web Title: Pakistan shutdown markets closes after 8pm energy crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Shehbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi-Meloni Meet : पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींची घेतली भेट ; रोमच्या कोलोसियममधील खास फोटो केले शेअर
1

PM Modi-Meloni Meet : पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनींची घेतली भेट ; रोमच्या कोलोसियममधील खास फोटो केले शेअर

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद
2

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?
3

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?

Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार
4

Melodi: भारत-इटली संबंधांना मोदी- मेलोनींच्या मैत्रीचा नवा रंग; 8 व्या भेटीत होणार संरक्षण आणि ‘AI’ क्षेत्रातील ‘हे’ ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.