Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : पाकिस्तानच्या थरपारकरमध्ये भीषण अपघात! रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, गरोदर महिलेसह 9 ठार

Pakistan News : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थरपारकर येथे रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका गर्भवती महिलेसह नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 29, 2026 | 02:19 PM
Pakistan Ambulance Blast News Tharparkar Oxygen Cylinder Explosion

Pakistan Ambulance Blast News Tharparkar Oxygen Cylinder Explosion

Follow Us
Follow Us:
  • भीषण स्फोट आणि जीवितहानी
  • आरोग्य कर्मचारी आणि निष्पापांचा बळी
  • प्राथमिक निष्काळजीपणा अन् प्रशासकीय हालचाली

पाकिस्तानच्या (Pakistan News) सिंध प्रांतातील थरपारकर जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नगरपारकर तालुक्यातील डानो धांधाल भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. या अपघातात एका गरोदर महिलेसह तब्बल नऊ जणांचा जागीच व उपचारादरम्यान करुण अंत झाला आहे. तर अनेक जण आगीच्या तीव्र झळांमुळे गंभीररीत्या भाजले आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना ‘पीपल्स प्रायमरी हेल्थकेअर इनिशिएटिव्ह’ (PPHI) च्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्राबाहेर घडली. रुग्णवाहिकेत एक गरोदर महिला गंभीर स्थितीत वैद्यकीय उपचाराची वाट पाहत होती. याच वेळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी व तंत्रज्ञ रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडर बदलण्याचे आणि नवीन सिलेंडर बसवण्याचे काम करत होते. दुर्दैवाने, हे काम सुरू असतानाच अचानक तंत्रज्ञानात बिघाड होऊन अथवा गॅस गळतीमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड ताकदीचा स्फोट झाला आणि रुग्णवाहिकेने क्षणात रौद्ररुप धारण केले.

 भीषण आगीच्या ज्वाळा अन् आरोग्य कर्मचाऱ्यांसह निष्पापांचा होरपळून मृत्यू

स्फोट इतका भयानक होता की त्याचा आवाज काही किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. स्फोटाच्या धुमश्चक्रीनंतर रुग्णवाहिकेला क्षणार्धात भीषण आग लागली. वाहनाच्या आत उपस्थित असलेल्या गरोदर महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. आगीच्या प्रचंड लोटामध्ये होरपळून गरोदर महिला आणि तिच्यासोबत आलेल्या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय, रुग्णवाहिकेजवळ काम करत असलेले आरोग्य कर्मचारीही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये PPHI चे डिस्पेंसर, रुग्णवाहिकेचा चालक, एक सुरक्षा रक्षक आणि आरोग्य केंद्रातील आणखी एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. स्फोटानंतर आरोग्य केंद्राच्या परिसरात एकच पळापळ झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वाहनाचा आणि त्यातील प्रवाशांचा कोळसा झाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?

गंभीर जखमींना कराचीला हलवले; वैद्यकीय सुविधांच्या द्येयतेवर पुन्हा एकदा प्रश्न

या भीषण दुर्घटनेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन दाई (Midwives) आणि एक महिला परिचारिका देखील गंभीररीत्या भाजल्या आहेत. थरपारकरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) आणि नगरपारकरच्या सहाय्यक आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गंभीर जखमींना स्थानिक पातळीवर प्राथमिक वैद्यकीय मदत दिल्यानंतर तातडीने कराची येथील उच्चस्तरीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. कराचीला नेत असतानाच एका जखमीची वाटेतच प्राणज्योत मालवली, ज्यामुळे या अपघातातील एकूण मृत्यूंची संख्या नऊवर पोहोचली.

जिल्हा पोलीस प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या कसून चौकशीचे आदेश दिले आहेत. सिलेंडर बसवताना सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का, किंवा वापरण्यात आलेला ऑक्सिजन सिलेंडर कालबाह्य व सदोष होता का, या दिशेने फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?

 दुष्काळग्रस्त थरपारकर अन् पाकिस्तानच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे वास्तव

सिंध प्रांतातील थरपारकर हा भाग प्रामुख्याने दुष्काळग्रस्त आणि अत्यंत मागासलेला प्रदेश मानला जातो. येथील स्थानिक जनता वैद्यकीय उपचारांसाठी पूर्णपणे सरकारी आरोग्य केंद्रे आणि PPHI सारख्या संस्थांच्या रुग्णवाहिकांवर अवलंबून असते. मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या या भागात आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा नवीन नाही. याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये मिठी सिव्हिल हॉस्पिटलने इंधनाचा निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत एका मृत बालकाचा मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला होता, ज्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली होती.

ताजी घटना ही पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणेच्या ढासळलेल्या अवस्थेची आणि सुरक्षा मानकांच्या अभावाची गंभीर साक्ष देते. जीवन वाचवणारी रुग्णवाहिकाच जेव्हा मृत्यूचा सापळा बनते, तेव्हा सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवावा, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. या घटनेनंतर सिंध सरकारवर सुरक्षेचे कडक नियम लागू करण्यासाठी सर्वच स्तरातून मोठा दबाव निर्माण होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: थरपारकर येथे रुग्णवाहिकेत स्फोट कशामुळे झाला?

    Ans: आरोग्य केंद्राबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत कर्मचारी ऑक्सिजन सिलेंडर बदलत असताना तांत्रिक बिघाडामुळे सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

  • Que: या दुर्घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: या दुर्दैवी अपघातात एका गरोदर महिलेसह, तिच्या सोबतचे दोन नातेवाईक आणि ६ आरोग्य कर्मचाऱ्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: ही घटना पाकिस्तानमधील कोणत्या भागात घडली?

    Ans: ही दुर्घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थरपारकर जिल्ह्यातील नगरपारकर तालुक्यात डानो धांधाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर घडली.

Web Title: Pakistan tharparkar ambulance oxygen cylinder blast nine dead hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Ambulance
  • Blast
  • Pakistan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.