Pakistani expert Qamar Cheema blames India over killing Abu Qatal makes serious allegations against India
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तानमधील पंजाबच्या झेलम प्रांतात शनिवारी रात्री (15 मार्च) अज्ञात हल्लेखोरांकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. अबू कताल हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार हाफिद सईदचा विश्वासू आणि जवळचा व्यक्ती होता. दरम्यान पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी अबू कतालच्या हत्येचा आरोप भारतावर लावला आहे.
गेल्या वर्षी 9 जून 2024 मध्ये काश्मीरमधील रियासी येथील शिव-खेडी शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरुंता बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. अबू कताल या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 2023 मधीलही राजौरी हल्ल्यासाठी अबू कताल जबाबदार होता. यामुळे तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत होती. त्याच्यावर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा आरोप होता.
काय म्हणाले कमर चीमा?
याच दरम्यान अबू कतालच्या हत्येनंतर पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांनी अबू कतालच्या हत्येचा आरोप भारतावर लावला. त्यांनी म्हटले की, भारताच्या डीपी स्टेटला पाकिस्तानमध्ये काम करण्याचा मार्ग सापडला आहे. त्यांना पाकिस्तानबद्दल सर्व काही माहिती आहे. असा दावा कमर चीमा यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, भारताचे पाकिस्तानवर संपूर्ण लक्ष्य असून, येथे कोण काय करत आहे? कोण कुठे आणि किती वाजता आहे हे सर्व काही माहित आहे.
शिवाय भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधील प्रत्येक घटनांबद्दल माहिती आहे. त्यांनी अबू कतालच्या हत्येचे उदाहरण देत म्हटले की, पाकिस्तानात दहशतवाद्याची हत्या होते आणि पाकिस्तानी माध्यमांना याची पुसटशी कल्पनाही नसावी, तर दुसरीकडे भारतीय माध्यमांकडे सर्व तपशील उपलब्ध आहे.
भारतीयांनी पाकिस्ताना घुसखोरी केली आहे- कमर चीमा
कमर चीमा यांनी म्हटले की, भारतीय डीप स्टेटला पाकिस्तानमधील कोणत्याही हलचालींबद्दल भारतीय माध्यंमांकडून माहिती मिळते. पण ही माहिती कशी, मिळत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील लोक पाकिस्तानच्या सुरक्षा प्रणालीमध्ये घुसले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या लोकांना विकत घेतले असून त्यांचा वापर लोकांना मारण्यासाठी करत आहेत.
मात्र, यावर भारताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून आता भारत यावर काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचे लक्ष्ये लागले आहे.