पाकिस्तानामध्ये रक्तपात थांबेना; बलुच बंडखोरांच्या हल्ल्यात लष्करी ताफ्यातील 7 ठार...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: रविवारी (16 मार्च) पाकिस्तानात पुन्हा एक मोठा हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्केट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात लष्कराच्या सात लष्करी सैनिकांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) ने घेतली असून 90 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचा दावा त्यांनी केला आहे.
लष्कराच्या वाहनांना IED ने भरलेल्या वाहनाची टक्कर
मीडिया रिपोर्टनुसार, हा हल्ला क्वेट्टापासून 150 किमी अंतरावर असलेल्या नोश्की येथे झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराने संपूर्ण परिसरात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी लष्कराचा ताफा तफ्तानला निघाला होता. या ताफ्तात सात लष्करी बस आणि इकर दोन वाहने होती. या बस आणि वाहनांवर बलुच बंडखोरांनी हल्ला केला. मीडिया रिपोर्टनुसार, IED ने भरलेले एक वाहनाने लष्कराच्या ताफ्याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला. हा एक आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले आहे.
आत्मघात हल्ला
नोशकी स्टेशनचे SHO जफरउरल्लाह सुलेमानी यांनी या हल्ल्याबद्दल बोलताना म्हटले आहे की, हा आत्मघातकी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरुन हा निष्कर्ष काढण्यात आला. आत्मघाती हल्लेखोरानी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्याला धडकवले यामुळे मोठा स्फोट झाला. सुलेमानी यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, त्यांनी मृत सैनिकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
BLA चा हल्ल्याबाबत मोठा दावा
BLA ने निवेदन जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वाकारली आहे. बलुच लिबरेश आर्मीने आत्मघात तुकडी असलेल्या माजीद ब्रिगेडने नोशकी येथील RCD महामार्गावर पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केल्याते या निवेदनात म्हटले आहे. या ताफ्यात सात लष्करी बस होत्या. यापैकी एका बस स्फोटात पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या हल्ल्यानंतर BLA च्या फतेह पथकाने दुसऱ्या लष्करी बसला घेरले आणि सैनिकांना ठार मारले. यामुळे 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा BLA ने केला आहे.