भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; रियासी हल्ल्याचा मास्टमाइंड अबू कतालची पाकिस्तानात हत्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिस्तानामध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अबू कताल हा 26/11 च्या मुबंईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जवळता होता. कताल हा लष्कर-ए-तेयबाचा प्रमुख सदस्य होता. जम्मू काश्मीरमधील अनेक हल्ल्यांच्या कटात त्याचा हात होता. त्याने भारतातही अनेक मोठे हल्ले केले आहेत.
रियासी हल्ल्याचा मास्टमाइंड
गेल्या वर्षी 9 जून 2024 मध्ये काश्मीरमधील रियासी येथील शिव-खेडी शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरुंता बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. अबू कताल या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 2023 मधीलही राजौरी हल्ल्यासाठी अबू कताल जबाबदार होता. तसेच सिंघी जम्मू आणि काश्मीरमधील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता.
POK मध्ये असा मारला गेला अबू कताल
मीडिया रिपोर्टनुसार, काल रात्री 8 वाजता पंजाब प्रांतातील झेलम येथे अबू कतालची हत्या करण्यात आली. अबू कतावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. 29/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने त्याला लष्कराचा मुख्य ऑपरेशन कमांडर म्हणून नियुक्त केले होते. हाफिजच्या आदेशानुसार कताल हदशतवादी कायरवाय करत असे.
राजौरी हल्ल्यात अबू कताल सामील- NIA
राष्ट्रीय तपास संस्थेने(NIA) 2023 च्या राजौरी हल्ल्यातील आरोपींमध्ये अबू कताल सामील असल्याचे म्हटले होते. मीडिया रिपोर्टनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी राजोरी जिल्ह्यातील धांगरी येछे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात साजत जणांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. या प्रकरणांमद्ये NIA ने अबू कतालविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा समावेश होता.
हाफिद सईदच्या मृत्येचेही वृत्त
अबू कतालवर झालेल्या हल्ल्यात हदशतवादी हाफिज सईदही मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, हाफिजच्या मृत्यूता दावा फेटाळण्यात आला आहे. या हल्ल्यात दुचारीस्वारांनी अबू कतालच्या कारवर गोळीबार केला. या हल्ल्यात कताल ठार झाला असून हाफिज सईद जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अनेक दहशतवादी ठार
गेल्या काही काळात पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच लष्कराचा टॉप कमांडर रियाज अहमद उर्फ कासिम मारला गेला. त्याच वेळी, बशीर अहमद यांचाही गूढ मृत्यू झाला.