Pakistani Finance Minister says Conflict with India won't have large fiscal impact on pakistan
इस्लामाबाद: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना नष्ट करुन टाकले होते. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान चवथाळलेला होता. यादरम्यान पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांनी अनेक खोटे दावे केले. पाकिस्तानने भारताच्या कारवाईमुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले होते. परंतु दावा त्यांच्या अर्थमंत्र्यांनी खोडून काढला आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी दावा केला आहे की, भारताच्या ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तानचे नुकासान नक्कीच झाले आहे, परंतु याचा दीर्घकालीन परिणाम होणार नाही. वर्षभारता पाकिस्तान आर्थिक नुकसान भरुन काढेल. गेल्या शनिवारीच आयएमएफकडूनव पाकिस्तानला २.३ अब्ज डॉलरचे कर्ज मिळाले होते. पाकिस्तानवर आधी ७३.६९ ट्रिलियन कर्ज आहे. पाकिस्तानच्या कर्जाबाबतची ही माहिती स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने दिली आहे.
दरम्यान वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी सांगितले की, पाकिस्तान अमेरिकेशी व्यापारावर चर्चा करत आहे. यामुळे या चर्चेमध्ये लवकरच प्रगती दिसून येईल असे औरंगजेब यांनी म्हटले आहे. औरंगजेब यांनी सांगितले की, पाकिस्तान अमेरिकेतून उच्च दर्जाचा कापूस आणि सोबायीन आयात करण्यावर लक्ष देत आहे. तसेच हायड्रोकार्बन आणि इतर काही गोष्टी देखील अमेरिकेतून आयात करण्याचा पाकिस्तानचा विचार सुरु आहे.
दरम्यान पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळाले तेव्हा भारताने मदतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता. आयएमएफकडून पाकिस्तानला २.३ अब्ज डॉलर्सते कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी १ अब्ज डॉलर्स ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा हप्ता आहे. यापूर्वी २०२३ मध्ये आयएमएफने पाकिस्तानला ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते.
मोहम्मद औरंगजेब यांनी म्हटले की, भारतासोबतच्या कारवाईमुळे झालेल्या नुकसानीला खर्चात कमी कालावधीसाठी वाढ म्हणून संबोधले आहे. या स्थितीचा पाकिस्तानवर फार कमी काळ परिणाम होईल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सिंधू जल कराराच्या स्थगितीवरही अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पाकिस्तानवर याचा तात्काळ कोणताही परिणाम होणार नाही. सध्या पाकिस्तान सरकार भारतासोबत यावर चर्चा करु इच्छित आहे. असा विश्वास आहे की सिंध जल करार लवकरच पुनर्सुंचित होईल.
दरम्यान भारत आण पाकिस्तानमधील युद्धबंदीही अनिश्चित आहे. पाकिस्तान भारतावर हल्ले करुन शस्त्रसंधीच्या कराराचे उल्लंघन करत आहे. भारताने इशार दिला आहे की, यावेळी पाकिस्तानच्या कोणत्याही कुरापती भारत सहन करुन घेणार नाही.