
फोटो सौजन्य AI
पाकिस्तानने मात्र इराणसोबतचा द्विपक्षीय व्यापार आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सुरु ठेवण्याची भूमिका घेतली आहे . कदाचित अमेरिकेच्या किती नादाला लागायचे याचा विचार करूनच पाकिस्तान असे वागत असल्याचे बोलले जात आहे .
Gaza War : युद्धविरामानंतरही गाझात ९०० हून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्रालयाचा गंभीर दावा
काहीही केल्या इराण शरण येत नाही म्हंटल्यावर आधीच कित्येक वर्ष लादलेले आर्थिक निर्बंध अजूनच कठोर करून इराणची अर्थ व्यवस्था पूर्णपणे घाईला आणायची यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे . तेल आणि गॅससह शिपिंग , तंत्रज्ञान , डिजिटल मालमत्ता आणि इतर क्षेत्रांवरही कारवाई करण्यात आली . अमेरिकेने इराणशी आर्थिक संबंध कायम ठेवणाऱ्या देशांनांही निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो , असा इशारा दिला आहे .
त्यामुळे इराणचे प्रमुख व्यापारी भागीदार असलेल्या देशांवर दबाव वाढला आहे . पण चीनने मात्र अमेरिकेच्या या धमकीला उत्तर देत म्हंटले कि ते इराणसोबतचा व्यापार बंद करू शकत नाहीत . तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे . एकीकडे पाकिस्तानचे अमेरिकेसोबत महत्वाचे राजनैतिक आणि सुरक्षा संबंध आहेत . तर दुसरीकडे इराण हा त्याच्या शेजारील देश आहे . दोन्ही देशांमध्ये सुमारे ९०० किलोमीटरची सीमा असून सीमावर्ती भागातील व्यापार आणि आर्थिक व्यवहार पाकिस्तानसाठी महत्वाचे आहेत .
India-Russia Oil : ऑगस्टमध्ये भारताची रशियन तेल आयात 26% घटली; चीनच्या वाढत्या खरेदीचा मोठा परिणाम
अमेरिकेने जरी पाकिस्तान आणि इतर देशांवर जरी निर्बंध घालण्याचे सांगितले असले तरी पाकिस्तानने इराणवरील एकतर्फी निर्बंधांना मान्यता देण्यास नकार दिल्याचे समजते आहे . पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत द्विपक्षीय व्यापार दोन्ही देशांमधील करार आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे . कारण पाकिस्तानसाठी इराण सोबतचे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत .
ऊर्जा , सीमावर्ती वाहतूक आणि सुरक्षा या मुद्द्यांवरती दोन्ही देशांचे हितसंबंध जोडलेले आहेत . त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन केल्यास पाकिस्तानच्या सीमावर्ती अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे . तसेच धार्मिक बाजूने विचार केल्यास इराण वर प्रेम असलेले नागरिक पाकिस्तानमध्ये आहेत . खामेनेईच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये ही जनता रस्त्यांवर आलेली जगाने पाहिली आहे .
अमेरिका आणि इराण मध्ये पाकिस्तानमध्ये शांतता करार झाला होता . पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली होती . फक्त यामुळेच नाही तर पाकिस्तानला दोन्ही देशांची गरज आहे त्यामुळे पाकिस्तान कोणा एकाकडे आपले माप झुकवू शकत नाही . यातच पाकिस्तानची कसरत होत असल्याचे बोलले जात आहे . इराण अमेरिका युद्धामुळे तेलावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानला सुद्धा हे युद्ध लवकरात लवकर बंद व्हावे असे अपॆक्षित आहे .
तसेच इराण आणि अमेरिकेला आपआपल्या मागण्या मान्य करून घेण्यातच युद्धाचा विजय आहे हे चांगलेच माहिती आहे . त्यामुळे मध्यस्थीची भुमीका बजावणाऱ्या पाकिस्तानचे मधला कावळा होत आहे . त्याला दोन्ही देशांकडून तेवढेच प्रेशर आहे . त्यामुळे मध्यस्ती करणे ही पाकिस्तानसाठी तारेवरची कसरत झाली आहे . असे जाणकार सांगतात .