
फोटो सौजन्य AI
आपल्या प्रमुखांना मारण्याच्या कटामुळे हुथी शांत असलेले चिडले आणि त्यांनी सौदीची नाकेबंदी करायला सुरवात केली . पण जेव्हा सौदी समर्थक येमेन सरकार आणि अमेरिका सोबत असूनसुद्धा सौदीला हुथींचा बंदोबस्त काय करण्यात आला नाही . तेव्हा अमेरिकेतील मध्य निवडणुकांमुळे अमेरिकेला आता हुथींवर हल्ला करणं शक्य नसल्याने सुरवातीला पाकिस्तानला पुढे करण्यात आले .
पण पाकिस्तानची पंचाईत झाली मक्का पॅक्ट तर केला पण आता थेट हुथींसोबत लढाई करणे शक्य नाही कारण हुथी हे शिया समुदायाचे मुस्लिम आहेत आणि पाकीस्तानमध्ये शियांची संख्या जवळपास ३५ टक्के असल्याने आपल्या घरातील जनतेचा विरोध सहन होणार नाही यासगळ्यामधे इस्रायलचे चे सुद्धा नाव आले कि सौदीच्या मदतीला इस्रायल तयार आहे . पण जर सौदीने इस्रायलची मदत घेतली तर संबंध मुस्लिम देशांकडून सौदीवर आगपाखड होईल , नामुष्की होईल म्हणून इस्रायलची मदत घेणे सौदीला कधीही योग्य नाही . त्यामुळे या खेळात आता इजिप्त ने उडी घेतलेली आहे . आता यामध्ये पुढे काय घडणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
Iraq News : इराक मधील महिलांचे नवीन शस्त्र मोबाईल ; लैंगिक छळाविरुद्ध कॅमेऱ्याचा वापर
इजिप्तच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेने सौदी अरेबियाला सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व शक्य मदत देण्याची भूमिका मांडली आहे. सौदीचे सार्वभौमत्व, भौगोलिक अखंडता आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी इजिप्त सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात झाले आहे . मात्र, प्रत्यक्ष लष्करी मदतीचा निर्णय सौदीकडून विनंती आल्यास आणि आवश्यक संसदीय मंजुरीनंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे इजिप्त हा कितवा खेळाडू होणार आहे अजून गुलदस्त्यातच आहे असे म्हणावे लागेल .
येमेनमधील हुथी बंडखोरांनी अलीकडच्या काळात सौदी अरेबियातील रियाध विमानतळ आणि सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोच्या सुविधांवर हल्ले केले यावरून हुथींची ताकद आता किती वाढली आहे याचा अंदाज जगाला आला आहे . सौदीसमर्थित येमेन सरकारच्या सैन्याशी पुन्हा संघर्ष सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. या हल्ल्यांमुळे सौदीच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी संभाव्य लष्करी मदतीसाठी संसदेची विशेष बैठक बोलावण्याची मागणी केली. सौदीच्या संरक्षणासाठी इजिप्त तयार असले तरी कोणावरही आक्रमण करण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्यात आधीपासूनच मजबूत राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. २०१५ मध्येही इजिप्त सौदीच्या नेतृत्वाखालील येमेनमधील लष्करी आघाडीत सहभागी झाला होता; मात्र त्यावेळी त्याची लढाऊ भूमिका मर्यादित होती.असे समजते आहे .