
Pakistan Defense Minister Marilyn Monroe
पाकिस्तान (Pakistan) सध्या एका बाजूला भीषण आर्थिक मंदी, अंतर्गत राजकीय गोंधळ आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील वाढत्या हशतवादी कारवायांसारख्या गंभीर संकटांशी झुंजत आहे. हजारो पाकिस्तानी सैनिकांच्या सुरक्षेचा आणि भूराजकीय तणावाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना, देशाचे ७१ वर्षीय संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ मात्र भलत्याच गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय सुरक्षेची आणि सीमावर्ती भागातील तणावाची कोणतीही फिकीर न बाळगता, संरक्षण मंत्री थेट सोशल मीडियावर एआय-निर्मित (AI) फोटोंमधील कोडी सोडवण्यात आपला वेळ घालवत आहेत. या प्रकारामुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर हास्यास्पद टीका केली जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर नुकतीच एक एआय-जनरेटेड प्रतिमा पोस्ट करण्यात आली होती. ही प्रतिमा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो यांची होती. या फोटोमध्ये मर्लिन मन्रो आधुनिक कपड्यांमध्ये दिसत असून, युजर्सना त्या फोटोमध्ये असणारी एक तांत्रिक चूक किंवा त्रुटी ओळखण्याचे आव्हान देण्यात आले होते. सर्वसामान्यांसाठी हे एक साधे सोशल मीडिया कोडे होते, परंतु देशाच्या संरक्षण व्यवस्थेची धुरा खांद्यावर असणाऱ्या ख्वाजा आसिफ यांनी थेट या पोस्टवर उत्तर देत ती री-पोस्ट केली.
फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, विसाव्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रोच्या हातामध्ये आजच्या काळातील अत्याधुनिक ‘स्मार्टवॉच’ दिसत होते. एआय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या या फोटोतील हीच मुख्य त्रुटी होती. ७१ वर्षीय ख्वाजा आसिफ यांनी या फोटोकडे अत्यंत उत्सुकतेने पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता कमेंट बॉक्समध्ये “Watch” असे उत्तर लिहिले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अत्यंत उत्साहाने सोबत एक स्मायली इमोजी देखील जोडला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख
आपण देशाचे संरक्षण मंत्री आहोत आणि आपल्या एका एका डिजिटल हालचालीवर जगाचे लक्ष आहे, याचा बहुदा त्यांना विसर पडला असावा. त्यांनी दिलेले उत्तर आणि त्यांची ही बालिश कृती पाहून सोशल मीडियावर क्षणातच टीकेची झोड उठली.
देशातील जनतेला आणि सोशल मीडिया युजर्सना ख्वाजा आसिफ यांचा हा बेजबाबदारपणा अजिबात आवडलेला नाही. एरवी प्रत्येक आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर आपल्या नेत्यांची अंधाधुंध बाजू घेणारी पाकिस्तानी जनताच यावेळी ख्वाजा आसिफ यांच्यावर तुटून पडली आहे. नेटकऱ्यांनी विचारले आहे की, देशात सीमांवर तणाव असताना, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दररोज हिंसक घटना घडत असताना, देशाचे संरक्षण मंत्री एका अभिनेत्रीच्या एआय फोटोमध्ये घड्याळ शोधण्यात व्यस्त कसे राहू शकतात?
Pakistan is drowning in economic, political, and security crises, with KP on the brink of imploding from within. In the meantime, it’s Defence Minister, Khawaja Asif is busy boosting his newly created fake “American woman” burner account. We have grown-up problems being handled by guys acting like bored teenagers on X. You literally can’t make this up. @KhawajaMAsif — 𝐊𝐡𝐚𝐥𝐢𝐝 𝐖𝐚𝐫𝐝𝐚𝐠🇦🇫 (@Kali_Vardag) October 13, 2026
credit – social media and Twitter
अनेक युजर्सनी ख्वाजा आसिफ यांना त्यांच्या पदाची आठवण करून देत लिहिले की, “पाकिस्तान गंभीर राजकीय आणि आर्थिक गर्तेत अडकला आहे. लष्करी सुरक्षेचे मोठे प्रश्न समोर उभे आहेत, पण आमच्या संरक्षण मंत्र्यांचे प्राधान्यक्रम काही वेगळेच आहेत.” काहींनी उपरोधिकपणे म्हटले की, “खैबर पख्तुनख्वामधील जनता आणि सुरक्षा दले संकटात आहेत, पण सरकारला त्याची काहीही पर्वा नाही. मंत्र्यांना अभिनेत्रींचे फोटो पाहण्यापासून फुरसत मिळावी तर ते देशाकडे लक्ष देतील.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Food Day : 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन; भूकमुक्तीचा संकल्प आणि अन्नाची नासाडी रोखण्याची नवी चळवळ
ख्वाजा आसिफ यांनी आपल्या अजब दाव्यांनी आणि वक्तव्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे हसू करून घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि संसदेमध्ये अनेक हास्यास्पद विधाने केली आहेत. मात्र, देशावर सुरक्षेचे ढग जमा झालेले असताना एका ७१ वर्षीय जबाबदार मंत्र्याने दाखवलेली ही डिजिटल हलकीवृत्ती पाकिस्तानच्या राजकीय आणि प्रशासकीय गांभीर्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.