
Pakistan's EX-PM Imran Khan sisters allegedly manhandled outside Adiala Jail in Rawalpindi
Imran Khan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर २०२३ मध्ये घडलेल्या हिंसक आदोलनाला भडकवल्याचा आरोप आहे. सधझ्या त्यांचे कुटुंब त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. याच वेळी इम्रान खान यांच्या बहिणींसोबत धक्कादायक घटना घडली आहे. खान यांना त्या तुरुंगात भेटायला गेल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्यांना तुरुगांत बाहेर काढले असून ताब्यात घेतले आहे.
आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ(PTI) पक्षाच्या समर्थकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर सध्या पोलिसांची कारवाई सुरु आहे. खान यांच्या बहिणी अलिमा खान, उज्मा खान आणि नौरीन नियाझी रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात त्यांना भेटायला गेल्या होत्या. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना भेटू दिले नाही. तसेच त्यांना धक्के मारुन, फरपटत नेते बाहेर काढण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुरुंगाबाहेर खान समर्थक आणि त्यांच्या कुटुंबाचे शांततापूर्ण आंदोलन सुरु होते. या वेळी पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इम्रान खानच्या बहिणींनी सांगितले की, त्या त्यांच्या भावाला भेयटायला गेल्या होत्या यावेळी अधिकाऱ्यांनी बहीन नौरीन खान हिचे केस धरले, तिला जमिनीवर फेकला आणि फरपटत बाहेर काढले. तिने पोलिसांचे वर्णन क्रूर आणि निर्लज्ज शब्दांत केले आहे. तसेच तिने अल्लाह नक्कीच याचा न्याय करेल असे म्हटले आहे. खान यांच्या इतर दोन बहिणी अलिमा खान आणि उज्मा खान यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, अलिमा, नौरीन आणि उज्मा खान तुरुंगाबाहेर शांतपणे आंदोलन करत होत्या. पंजाब पोलिसांनी जाणूनबुजून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आहे. सरकार खान यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या समर्थकांना त्रास देत आहे.
२०२३ मध्ये पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात देशव्यापी निदर्शने झाली होती. या आंदोलनाने हिंसक रुप धार केले होते. यावेळी सरकार व लष्करावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला होता. इम्रान खान यांच्यावर अनेक प्रकरणांचे आरोप आहेत. तसेच त्यांची पत्नीी बुशरा बीबीवरही गैर-इस्लामिक विवाहाचा आरोप, सायफर गेट घोटाळा, आणि तोशाखाना प्रकरणे इम्रान खान यांची साथ दिल्याचा आरोप आहे.