
Pakistan’s Former PM Imran Khan
शनिवारी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबीला प्रसिद्ध तोशाखाना-२ भ्रष्टाचार प्रकरणात प्रत्येकी १७ वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. इम्रान खान आधीच रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात आहेत. आता या तोशखाना-२ भ्रष्टाचार प्रकरणात अनेक हाय-फ्रोफाइल लोकांचाही समावेश आहे. या प्रकरणातील निकाल हा रावळपिंडीतील उच्च-सुरिक्षत अदियाला तुरुंगात देण्यात आला आहे.
न्यायालयाचे न्याधीश शाहरुख अर्जुमंद यांनी हा निकाल जाहीर केला आहे. सुरक्षेच्या कारणास्व सर्व कामकाज तुरुंगातच पार पडले आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने पाकिस्तान दंड संहिता कलम ४०९ अंतर्गत इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना दोषी ठरवले आहे. त्यांना १७ वर्षांच्या अतरिक्त तुरुंगवासाच्या शिक्षेशिवाय १ कोटी रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.
२०२१ मध्ये सौदी अरेबियाकडून मिळालेल्या भेटी(रिश्वत) संदर्भात हे प्रकरण जोडण्यात आले आहे. इम्रान खान आणि बुशरा बीबीवर आरोप आहे की, त्यांनी नियमांविरोधात जाऊन महागड्या भेटवस्तू ठेवल्या आहे. त्यानंतर सरकारची फसवणूक केली आहे. न्यायालयाने याला देशद्रोह मानले असून कठोर शिक्षा सुनाली आहे.
या प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी सुरुवातीला राष्ट्रीय ब्युरो ला देण्यात आली होती. यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण सोपवले गेल. सप्टेंबर २०२४ मध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. यानंतर १२ डिसेंबर २०२४ रोजी इम्रान खान आणि बुशरी बीबीवरील आरोप अधिकृतपणे निश्चित करण्यात आले. तेव्हापासून इम्रान खान अदियाला तुरुंगात आहेत.
सध्या इम्रान खानच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. नव्या शिक्षमुळे इम्रान खान यांच्यावर अमानवी वागणूक केली जात असल्याचा दावा केला जात आहे. खान यांच्या समर्थकांनी आणि पीटीआयने त्यांना दीर्घकाळ एकांतवासात तुरुंगात ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवाय गेल्या महिन्यात त्यांच्या बहिणींना देखील भेटू दिले जात नव्हते, यामुळे खान यांच्या प्रकृतीबाब, त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र सराकने उपहात्मक उत्तर देत इम्रान खान सुरिक्षत असल्याचे म्हटले होते.
Ans: तोशखाना-२ भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Ans: इम्रान खान आणि बुशरी बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
Ans: २०२१ मध्ये सौदी अरेबियाकडून सरकारला मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या, ज्या इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरला बीबीने वैयक्तिक वापरासाठी ठेवल्याचा आरोप या प्रकरणात आहे.