Pakistan's former Prime Minister Imran Khan appeals to help for democracy, regional stability from America
इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गेल्या काही काळापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची शक्यता कमी दिसत असून त्यांच्या सर्थकांनी दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात ठेवणे हे पाकिस्तानच्या लोकशाही आणि कायद्याच्या विरोधात आहे. टाईम मॅगझिनने इम्रान खान यांच्या नावाने प्रकाशित केलेल्या एका लेखात, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय पुनरागमनाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी मदतीचेही आवाहन केले आहे.
त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, अमेरिका आणि पाकिस्तानमधील आर्थिक भागीदारीसाठी, स्थिरता निर्माण करण्यासाठी आणि दहशतवादांना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेतील. मात्र, या लेखात दिलेल्या माहितीची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
माझी अटक राजकीय षड्यंत्र – इम्रान खान
त्यांनी सध्याचा काळ देशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या लोकशाहीसाठी एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी, आपल्या अटकेला राजकीय षड्यंत्र ठरवले आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी असेही म्हटले की, हा संघर्ष त्यांचा वैयक्तिक नसून संपूर्ण देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित आहे. पाकिस्तान जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आणि येथे निर्माण झालेल्या संकटावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दहशतवादविरोधी टीका
इम्रान खान यांनी दहशतवादविरोधी प्रयत्नांवर भाष्य करताना म्हटले की, पाकिस्तान सरकार पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाविरुद्ध राजकीय दबाव वाढवत आहे. यामुळे दहशतवाविरोधी मोहिमा आणि सुरक्षा उपयांवर परिणाम होत आहे. त्यांनी दावा केला आहे की, खैबर पख्तूनख्यवा आणि बलुचिस्तान भागांमध्ये दहशतवादाचे प्रमाण अधिक असूनही सरकारने तिकडे दुर्लक्ष केले आहे.
शिवाय, सरकारने आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध सैन्य मोहिमा राबवण्यावर भर दिला आहे. तसेच न्याव्यवस्थेचाही गैरवापर केला करुन राजकीय सूड उगवला आहे. असे गंभीर आरोप इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सरकारवर केले आहेत.इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात नवीन चर्चांणा उधाण आले आहे. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपण वाढवम्याचा प्रयत्न सुरु केला आहे. देशात लोकशाही टिकवण्यासाठी त्यांची लढाई सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.