Pakistan's Supreme Court grants bail to Imran Khan ex pm
Imran Khan news in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला मंजूरी दिली आहे. जिओने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या हिंसाचाराशी संबंधी गंभीर आरोप करण्यात आले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी जामीन अर्जाला मंजूरी दिली आहे. हा पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय म्हणजेच पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे संस्थापक आहे. सध्या ते पाकिस्तानच्या अदियाल तुरुंगात आहेत. २०२३ मध्ये पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात देशव्यापी निदर्शने झाली होती. या आंदोलनाने हिंसक रुप धार केले होते. यावेळी सरकार व लष्करावर हल्ला झाला होता.
यानंतर हा सर्व प्रकार खान यांनी घडवून आणला असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्याविरोधत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यांनतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कुटुंबाने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वाच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश याह्या आफ्रिदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये न्यायमूर्ती मुहम्मद शफी सिद्दीकी, न्यायमूर्ती मियांगुल हसन औगजेब यांनी याचिकांवर सुनावणी केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तीन सदस्यांसीय न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. परंतु यावर सध्या पुनर्विचार सुरु आहे. सध्या इम्रान खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे, परंतु त्यांची सुटाक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. इम्रान खान यांना एकाच वेळी आठ प्रकरमांमध्ये जामीन मिळाला आहे. ९ मे रोजी २०२३ रोजी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
यापूर्वी तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला जामीन मंजूर झाला होता. मात्र, अन्य प्रकरणांमुळे त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही. 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अदियाला तुरुंगात आहेत. इम्रान खान यांच्यावर अनेक प्रकरणांचे आरोप आहेत. तसेच त्यांची पत्नीी बुशरा बीबीवरही गैर-इस्लामिक विवाहाचा आरोप, सायफर गेट घोटाळा, आणि तोशाखाना प्रकरणे इम्रान खान यांची साथ दिल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप