Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई

Physical violation: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील भारतीय वंशाच्या एका घरमालकावर एका महिला भाडेकरूचा वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप असून, त्यापाठोपाठ न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 07, 2026 | 01:01 PM
pennsylvania indian origin landlord venkatachalam mani sued Physical harassment tenant marathi news

pennsylvania indian origin landlord venkatachalam mani sued Physical harassment tenant marathi news

Follow Us
Follow Us:
  • घरमालकाकडून महिला भाडेकरूचा लैंगिक छळ
  • सूडबुद्धीने हीटर दुरुस्तीस नकार अन् घरात आग
  • अमेरिकेच्या न्याय विभागाकडून (DOJ) फेडरल खटला दाखल

अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या घरमालकाचे अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारे कृत्य समोर आले आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील स्टेट कॉलेज परिसरातील मालमत्ता मालक व्यंकटचलम मणी (Venkatachalam Mani) यांच्यावर एका महिला भाडेकरूचा वारंवार गंभीर लैंगिक छळ केल्याचा, तिला अयोग्य स्पर्श केल्याचा आणि तिने विरोध दर्शवताच तिच्यावर जीवघेणा सूड उगवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) आरोपी व्यंकटचलम मणी याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात एक गंभीर फेडरल खटला दाखल केला असून, कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

पीडित महिला तिच्या लहान मुलांसह व्यंकटचलम मणी यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होती. खटल्यातील कागदपत्रांनुसार, मणी याने सुरुवातीपासूनच त्या महिलेवर वाईट नजर ठेवली होती. त्याने तिला कागदपत्रांच्या कामाच्या बहाण्याने बोलावून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला, अश्लील चित्रे दाखवली आणि अवांछित लैंगिक प्रस्ताव ठेवले. मात्र, जेव्हा त्या स्वाभिमानी महिलेने घरमालकाचे हे सर्व अनैतिक प्रस्ताव ठामपणे आणि स्पष्ट शब्दांत नाकारले, तेव्हा आरोपी व्यंकटचलम मणी सूडबुद्धीने पेटून उठला आणि त्याने त्या कुटुंबाचे जिणे हराम करण्यास सुरुवात केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी; युनिसेफने जारी केला महाआणीबाणीचा इशारा

कडाक्याची थंडी, हीटर दुरुस्तीस नकार अन् अखेर घरात भयंकर आग

महिलेने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर मणी याने तिच्याविरुद्ध सूडाचे पाऊल उचलले. पेनसिल्व्हेनियामध्ये कडाक्याची थंडी असताना, त्या महिलेच्या घरातील हीटिंग सिस्टीम म्हणजेच हीटर/फर्नेस (Furnace) अचानक बंद पडला. कडाक्याच्या थंडीमुळे लहान मुलांचे हाल होत असल्याने पीडित महिलेने घरमालकाकडे हीटर लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनवणी केली. परंतु, वासनेंध झालेल्या मणी याने तिचे अवांछित प्रस्ताव नाकारल्याचा बदला घेण्यासाठी दुरुस्ती करण्यास उघडपणे नकार दिला आणि दुर्लक्ष केले.

घरमालकाच्या या अत्यंत निष्काळजी आणि सूडबुद्धीच्या वागण्यामुळे अखेर एक मोठा अपघात घडला. त्या सदोष हीटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन घरात अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले, ज्यामुळे पीडित महिलेला तिच्या लहान मुलांसह कडाक्याच्या थंडीत कसलाही आधार नसताना घरातून बाहेर पडून जीव वाचवावा लागला. घरमालकाच्या एका नीच कृत्यामुळे ते निष्पाप कुटुंब क्षणार्धात बेघर झाले आणि कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली.

HUD ची चौकशी अन् न्याय विभागाचा (DOJ) कडक इशारा

या भयंकर घटनेनंतर पीडित महिलेने हिम्मत न हारता अमेरिकेच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाकडे (U.S. Department of Housing and Urban Development – HUD) अधिकृत तक्रार दाखल केली. HUD च्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने आणि सखोल चौकशी केली. तपासात आरोपी घरमालक व्यंकटचलम मणी याने अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘फेअर हाउसिंग ॲक्ट’ (Fair Housing Act) चे थेट आणि गंभीर उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. तपास अहवाल सिद्ध झाल्यानंतर हे प्रकरण पुढील कडक कारवाईसाठी थेट अमेरिकेच्या न्याय विभागाकडे सोपवण्यात आले.

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या सहाय्यक ॲटर्नी जनरल हरमीत के. ढिल्लन (Harmeet K. Dhillon) यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपीला कडक इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, “केवळ लैंगिक प्रस्ताव नाकारले म्हणून कडाक्याच्या थंडीत भाडेकरूचा हीटर दुरुस्त न करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर, अमानवी आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. अमेरिकन न्याय विभाग देशभरातील महिला भाडेकरूंच्या हक्कांचे आणि सुरक्षेचे पूर्ण ताकदीने संरक्षण करेल.” तर पेनसिल्व्हेनियाचे अमेरिकन ॲटर्नी ब्रायन डी. मिलर (Brian D. Miller) यांनी स्पष्ट केले की, भाडेकरूंचे शोषण करणे किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार व सूडबुद्धीने कारवाई करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी

फेडरल कोर्टात खटला दाखल; भविष्यात भाड्याने घर देण्यावर बंदीची मागणी

अमेरिकेच्या न्याय विभागाने आता आरोपी व्यंकटचलम मणी याच्याविरोधात पेनसिल्व्हेनियाच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात (U.S. District Court for the Middle District of Pennsylvania) रीतसर फेडरल खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या माध्यमातून पीडित महिला आणि तिच्या मुलांवर झालेल्या मानसिक व शारीरिक अन्यायाबद्दल भरीव आर्थिक नुकसान भरपाईची (Monetary Damages) मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, आरोपी मणी याने भविष्यात पुन्हा कोणत्याही नागरिकाला अथवा महिलेला आपली मालमत्ता भाड्याने देऊ नये, यासाठी त्याच्यावर कायमस्वरूपी मनाई हुकूम (Permanent Injunction) लादण्याची कडक मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत आणि भाडेकरूंच्या हक्कांबद्दल पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे.

Web Title: Pennsylvania indian origin landlord venkatachalam mani sued physical harassment tenant marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • America
  • Physical Harassments
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी; युनिसेफने जारी केला महाआणीबाणीचा इशारा
1

Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी; युनिसेफने जारी केला महाआणीबाणीचा इशारा

Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी
2

Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी

British Army: लष्करी प्रशिक्षणादरम्यान 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; ब्रिटनच्या लष्करी महाविद्यालयातील धक्कादायक उलगडा
3

British Army: लष्करी प्रशिक्षणादरम्यान 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; ब्रिटनच्या लष्करी महाविद्यालयातील धक्कादायक उलगडा

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ
4

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.