
pm modi IBSA meet calls out unsc reforms know why
दरम्यान या परिषदेनंतर जोहान्सबर्ग येथे इब्सा शिखर परिषदही पार पडली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यता विस्तार न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी बदलत्या जागतिक समीकरणानुसार, UNSC विस्तार आणि सुधारणा होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदीना ठामपणे सांगितले आहे की, UNSC चा विस्तार हा अनिवार्य आहे.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या इब्सा देशांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्ट देण्याची वेळ आहे. जागतिक व्यवस्थेत बदल करण्यावर आता केवळ चर्चा नव्हे, तर त्यावर अमंलबजावणीची आवश्यकता आहे. मोदींनी पुढे म्हटले की, सध्या जगात अस्थिरता निर्माण होत आहे. जग विभाजित होत आहे. यामुळे इब्सा देशांची एकता, सहकार्य आणि मानवतावादचा संदेश अत्यंत महत्वाचा आहे.
पंतप्रधान मोदींनी इब्सा परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांना संबोधित करत म्हटले की, सध्या या देशांच्या सुरक्षा सहकार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सुरक्षेसाठी बैठकांना संस्थांत्मक स्वरुप द्यायला हवे. यामुळे या तिन्ही देशांमध्ये सुरक्षा विषयांवर अधिक सखोल आणि सातत्यपूर्ण संवाद राहिल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
याशिवाय पंतप्रधान मोदींनी दहशवादाच्या मुद्यावर देकील दुहेरी निकषांविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, जागतिक स्तरावर सर्वांनी एकजूट होऊन भूमिका घ्यायला हवी. G-20 परिषदेत देखील पंतप्रधान मोदींनी ड्रग्ज-दहशवादविरोधी प्रस्ताव मांडला होता. याला जी-20 च्या राष्ट्रांकडून समर्थन मिळाले.
याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भारताच्या यूपीआय, कोविन प्लॅटफॉर्म, सायबर सुरक्षा फ्रेमवर्क यांसारख्या क्षेत्रांतही सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच महिल्यांच्या नेतृत्त्वाखालील उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय त्यांनी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर एआयचा मानवी कल्ल्यासाठीच्या वापरावर भर देण्याचा आणि त्याचा गैरवापर रोखण्याच्या मुद्यांवरही आपले विचार मांडले. तंत्रज्ञान केवळ मानवाच्या हितासाठी असावे, त्याचा गैरवापर होऊ नये असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?
Ans: पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यता विस्तार न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Ans: भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा IBSA मध्ये समावेश आहे.