G-20 दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट ; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?
G-20 परिषेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अध्यक्षरामाफोसा यांची भेट घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन त्यांनी याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या शिखर परिषदेवेळी जोहान्सबर्ग येथे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी भेट झाली. आम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील भागीदारीच्या पैलूवंर चर्चा केली. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, एआय,खिनजे आणि संस्कृती अशा महत्त्वपूर्ण मुद्यांवर सहकार्याचा आढावा घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच त्यांनी G-20 परिशद यशस्वीरित्या पार पडल्यामध्ये रामाफोसा यांचे अभिनंदनही केले.
#WATCH | Johannesburg, South Africa | Prime Minister Narendra Modi holds a bilateral meeting with South African President Cyril Ramaphosa on the sidelines of the G-20 Summit. (Source: DD News) pic.twitter.com/MCc1ggXv8S — ANI (@ANI) November 23, 2025
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचीही भेट घेतली. त्यांचीशी देखील भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता, हवामान बदल, आणि जागाच्या शाश्वत विकासावर चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान कॅनडाचे (Canada) पंतप्रधान मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेवर ACITI भागीदारीची घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत तीन खंड आणि तीन महासागरांमध्ये लोकशाही सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी G-20 च्या दुसऱ्या सत्रात परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका खंडाच्या विकासाला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी ड्रग्ज आणि दहशतनादाविरोधी एकतेचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?
Ans: पंतप्रधान मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत संबंध वाढवण्याच्या द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली.
Ans: पंतप्रधान मोदींनी G-20 परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे केयर स्टारमर, कॅनडाचे मार्क कार्नी, ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांची भेट घेतली. तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांचीही भेट घेतली.
Ans: या परिषदेत जागतिक स्थिरता, आर्थिक विकास, हरित उर्जा, ग्लोबल साउथचा विकास, एआय तंत्रज्ञान, दहशतवाद यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.






