Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना; द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर लक्ष

PM Modi Two-Nation visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या दौऱ्यात पतंप्रधान मोदी ब्रिटनला भेट देणार आहेत. त्यानंतर ते मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 23, 2025 | 03:11 PM
PM Modi leaves for UK and Maldives visit

PM Modi leaves for UK and Maldives visit

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा पंतप्रधान मोदींचा चौथा दौरा आहे.या दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर आणि किंग चार्ल्स यांची भेट पंतप्रधान मोदी घेणार आहेत. स्टारमर यांच्या कार्यकाळातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यानंतर ते मालदीवच्या दौन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

हा दौरा भारत आणि ब्रिटनच्या व्यापार संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांत मुक्त व्यापार (FTA) काराराची घोषणा होणार आहे. तसेच संरक्षण, तंत्रज्ञान आणि हवामान यांसारख्या मुद्यांवरही चर्चा केली जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-चीन संबंधामध्ये सकारात्मक पाऊल; करोनानंतर पहिल्यांदाच चीनी नागरिकांसाठी व्हिसा मंजूर

दोन्ही देशांत गेल्या तीन वर्षापासून मुक्त व्यापार करारा (FTA) करारावर चर्चा सुरु होती. अखेर ६ मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये FTA करारावर सहमती दर्शवली. याकरारांतर्गत दोन्ही देशांतील अनेक उत्पादनांवरील कर कमी होणार आहे. यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संंधी उपलब्ध होती. तसेच व्यापर आणि गुणंतवणूकीला चालना मिळेल. दोन्ही देशांतील व्यापार १२० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ब्रिटनमधील हा करार अत्यंत महत्वपूर्ण आहे. ब्रिटन आणि भारताच्या द्विपक्षीय संबंधासाठी देखील हा दौरा महत्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

Delhi: Prime Minister Narendra Modi departs for a two-nation visit to the United Kingdom and Maldives.

PM Modi will pay an official visit to the United Kingdom from 23 – 24 July. In the second leg of his visit, PM will undertake a State Visit to Maldives from July 25–26.… pic.twitter.com/vGQEWJ9Khg

— ANI (@ANI) July 23, 2025

यानंतर मालदीवला रवाना होतील पंतप्रधान

ब्रिटनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. २५ ते २६ जुलै दरम्यान हा दौरा असेल. हा दौरा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुन होत आहे. हा पंतप्रधान मोदींचा मालदीवचा तिसरा दौरा आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार आहे. व्यापर आणि सागरी सुरक्षेसाठी भारत आणि मालदीवचे संबंध अधिक महत्वाचे मानले जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मोदींची वरात लंडनच्या घरात! पंतप्रधान दौऱ्यावर असताना व्यापाराबाबत आली ‘गुडन्यूज’

Web Title: Pm modi leaves for uk and maldives visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • britain
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

“मतदारांची नावे सॉफ्टवेअर वापरून हटवण्यात आली,लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार…”, राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला
1

“मतदारांची नावे सॉफ्टवेअर वापरून हटवण्यात आली,लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार…”, राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर
2

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर

‘धन्यवाद मित्रा…’, ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांचा PM मोदींना खास फोन; भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर चर्चा
3

‘धन्यवाद मित्रा…’, ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांचा PM मोदींना खास फोन; भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर चर्चा

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू लवकरच अमेरिका दौऱ्यावर; मुस्लिम देशांच्या बैठकीनंतर दिले डोनाल्ड ट्रम्प यांनी आमंत्रण
4

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू लवकरच अमेरिका दौऱ्यावर; मुस्लिम देशांच्या बैठकीनंतर दिले डोनाल्ड ट्रम्प यांनी आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.