PM Modi on a visit to Ghana, Trinidad and Tobago and Namibia Argentina
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून (२ जुलै) पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यादरम्यान घाना, त्रिनिदाद, टोबॅगो नामिबियाला पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. तर ब्राझीलला देखील पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. घाना राष्ट्रापासून हा दौरा सुरु होणार आहे.यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेटिंना आणि ब्राझीलला भेट धेणार आहे. ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सामील होणार आहे.
ब्रिक्स परिषदेनंतर नामिबियाला पंतप्रधान मोदी भेट देतील. या दौऱ्याचा उद्देश भारताचे या देशांसोबत राजकीय, आर्थिक, तांत्रिक संबंध दृढ करणे आहे. यामुळे भारताच्या जागतिक दक्षिण धोरणांतर्गत आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकेत सहकार्य वाढवण्यास मदत होणार आहे. या भेटीमुळे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होतील. तसेच भारत आफ्रिकेतील संबंध देखील नव्या अध्यायाकडे वळतील.
पंतप्रधान मोदी घाना राष्ट्राच्या भेटीदरम्यान भारत लसीकरण केंद्रासाठी घानाला मदत करेल. यामुळे घानातील आरोग्य सुविधा मजबूत होण्यास मदत होईल. सध्या घाना आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याशिवाय घानामध्ये पंतप्रधान मोदी सुमारे 16 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार सध्या 24 हजार कोटी रुपयांचा आहे.
Special Briefing by MEA on PM’s visit to Ghana, Trinidad & Tobago, Argentina, Brazil, and Namibia
https://t.co/8mo8BKcb8N— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 30, 2025
यानंतर पंतप्रधान मोदी त्रिनिदादला भेट देणार आहे. तसेच टोबॅगोलाही भेट देणार आहे. हा पंतप्रधानामोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोला पहिलाच दौरा आहे. हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विकसनशील देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर या दौऱ्यात चर्चा होणार आहेत.
या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी नामिबियाला भेट देणार आहे. पतंप्रधान मोदींचा नामिबियाला देखील हा पहिलाच दौऱा आहे. 27 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान नामिबियाला भेट देतील. यावेळी पंतप्रधान मोदी नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदैद्व यांच्याशी चर्चा करतील. नामिबियात पंतप्रधान मोदी भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस च्या करारावर चर्चा करण्यात आहेत. यामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहाकर्य प्रस्थापित होईल.तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूकवरीही चर्चा होणार आहे. याशिवाय नामिबियाच्या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझील दौऱ्यावर देखील जाणार आहेत.