Global Defence Race : जगातील 'या' देशांनी २०२५ मध्ये केली सर्वात जास्त शस्त्र खरेदी; जाणून घ्या भारताने किती खर्च केला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या जगभरात संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीची तीव्र स्पर्धा सुरु आहे. अनेक देश आपले संरक्षण ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच काही देश शस्त्रे विकिण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतानेही स्वदेशी शस्त्रे बनवून लष्करात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच २०२५ ची ग्लोबल डिफेंस रेसची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या देशाने किती खर्च केला, किती शस्त्रे विकली याची माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, २०२५ मध्ये अनेक देशांनी अरबो डॉलर्सचे संरक्षण करार केले आहे. अनेक देशांनी केवळ धोरणात्मक, संरक्षणात्मक दृष्टीकोनातूनच नव्हे तर राजनैतिक दृष्टीकोमनातूनही संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या देशांमध्ये भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया, पोलंड, ब्रिटन, फ्रान्स, जपान, आणि राष्ट्रांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत आघाडीवर आहे.






