
PM Modi honored with Slovakia's highest award
US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना; शक्तिशाली B-52 बॉम्बर कोसळून ८ जणांचा दुर्दैवी अंत
पंतप्रधान मोदींनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा सन्मान भारत आणि स्लोव्हाकियाच्या मैत्रीला समर्पित केला. तसेच हा सन्मान १४० कोटी भारतीयांचा असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदींना आपतापर्यंत परदेशी सरकारकडून ३३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनीही या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. यामुळे भारत आणि स्लोव्हाकियाच्या मैत्रीला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाच्या पहिल्याच दौऱ्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणे अत्यंत सन्मानजक बाब असून याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्लोव्हाकिया युरोपमधील एक छोटेस राष्ट्र असून १९९३ मध्ये तो स्वतंत्र झाला होता.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढवण्याविरही चर्चा होणार आहे. तसेच संरक्षण सहकार्य वाढविण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात भेटीत दोन्ही देशांनी प्रवासन, डिजिटन टेक्नोलॉजी आणि डिफेन्स क्षेत्रात सहकार्य वाढविणाऱ्या ११ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या दौऱ्यानंतर पंतप्रधान फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बहुपक्षीय G-7 शिखर परिषदेतही १६ आणि १७ जून रोजी सहभागी होणार आहेत. याचा उद्देश नवोपक्रम आणि विकासाच्या क्षेत्रात प्रमुख भागीदारांशी संबंध अधिक दृढ करणे आहे. यापूर्वी त्यांनी १४ जून रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. या भेटीत भारत-फ्रान्स भागीदारी बळकट करणाऱ्यावर चर्चा झाली.
Honoured to receive The Order of the White Double Cross (1st Class) in Bratislava this evening. My gratitude to the people and Government of Slovakia for this honour, which belongs to the 140 crore people of India. I dedicate this award to the enduring friendship between India… pic.twitter.com/FXs96XremQ — Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026