US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना; शक्तिशाली B-52 बॉम्बर कोसळून ८ जणांचा दुर्दैवी अंत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (१५ जून, स्थानिक वेळेनुसार) सकाळी ११.२० च्या सुमारास ही घटना घडली. B-52 बॉम्बर हे विमान प्रशिक्षण मोहिमेवर असताना कोसळले. विमानाच्या उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे समजले. यानंतर वैमानिकाचे विमानावरी नियंत्रण सुटले आणि रनवे परिसरात कोसळले.
विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण विमानाला विळखा घातला. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग एवढी भंयकर होती की विमानातील कोणीही वाचू शकले नाही. उड्डाणावेळी विमानात वैमानिकासाह ८ जण उपस्थित होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.
एडवर्ड्स एअर फोर्स बेसचे अधिकारी कर्नल जेम्स हेस यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी या अपघातात आठ महत्त्वाचे अधिकारी गमावले असल्याचे सांगितेल. मिळालेल्या माहितीनुसार, आठ मृत व्यक्तींमध्ये लष्करी कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सध्या या अपघाताचे कारण समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानुसार, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून काही महिन्यांत याचा तपशील दिला जाईल असे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
B-52 बॉम्बर हे अमेरिकेच्या हवाई दलाचे अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तीशाली विमान मानले जाते. हे विमान लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी वापरले जाते. याचा शस्त्र वाहतुकीसाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
BREAKING: A U.S. Air Force B-52 bomber crashed shortly after takeoff at Edwards Air Force Base, triggering an emergency response. Emergency crews rushed to the scene as thick black smoke billowed from the wreckage scattered across the desert airfield. More details, including… pic.twitter.com/JRx3R4ElJW — Fox News (@FoxNews) June 15, 2026
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO






