पंतप्रधान मोदींचे पुतिन यांना निमंत्रण; भारत-रशिया संबंधाची नवी सुरूवात
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भारत भेटीचे औपचारिक आमंत्रण दिले आहे. अशी माहिती क्रेमिनलचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुतिन 2025 च्या सुरूवातीला भारताला भेट देतील. या भेटीचा उद्देश भारत आणि रशिया मजबुत करण्याचा आहे असे त्यांनी सांगितले. रशिया-भारत संबंध सुधारतील अशा अपेक्षा या भेटीद्वारे ठेवण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशाच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.
भारत-रशिया संबंध बळकट करणे
भारत आणि रशिया यांच्यात संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्य आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे या क्षेत्रांतील सहकार्य आणखी वृद्धिंगत होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, या भेटीत जागतिक स्तरावरील आव्हानांवरही चर्चा होईल. युक्रेन संघर्ष, ऊर्जा संकट आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील वाढता तणाव हे महत्त्वाचे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. भारत आणि रशिया या जागतिक मुद्द्यांवर अनेकदा समान भूमिका घेत असल्यामुळे हा संवाद दोन्ही देशांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती मजबूत करण्यास हातभार लावेल.
दोन्ही देशांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने पाऊल
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात नियमित संवाद ठेवण्याचा करार आहे, आणि हा दौरा त्याचाच एक भाग आहे. या भेटीमुळे दोन्ही नेत्यांना द्विपक्षीय संबंधांचे विश्लेषण करण्याबरोबरच भविष्यातील दिशा ठरवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राबरोबरच नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याची दारे खुली करण्याचा या भेटीत प्रयत्न होईल. भारत-रशिया संबंध केवळ ऐतिहासिक नव्हे, तर धोरणात्मक महत्त्वाचे मानले जातात.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत, या संबंधांना नवे आयाम मिळवून देणे गरजेचे ठरते. पुतिन यांच्या भारत भेटीमुळे या भागीदारीचे नवे क्षितिज दिसेल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत, पुतिन यांचा दौरा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. या भेटीमुळे केवळ भारत-रशिया संबंधच नव्हे, तर जागतिक पातळीवर दोन्ही देशांचे स्थान अधिक दृढ होईल. त्यामुळे 2025 मधील ही ऐतिहासिक चर्चा भारत-रशिया संबंधांसाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.
मास्कोत पुतिन आणि नरेंद्र मोदींची भेट
यापूर्वी मास्कोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. त्यावेळी युरोपीय राष्ट्रांसह अमेरिकेने भारत-रशिया संबंधावर टिका केली होती. सध्या पुतिन यांचा दौरा निश्चित झाल्याने पाश्चिमात्य राष्ट्रांचे याकडे लक्ष लागलेले आहे. अध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी अमेरिकेत सत्तांतर होणार आहे. यामुळे भू-राजकीय परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी-पुतिन यांच्या भेटीला वेगळे महत्त्व असल्याचे म्हटले जात आहे.