फोटो सौजन्य: सोशल मीडिया
देर अल-बालाह: इस्त्रायल-हमास युद्धामुळे गाझामध्ये मानवी जीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांनी मानवी जीवनासाठी लागणाऱ्या प्रथमिक गरजादेखील मिळणे कठीण झाले आहे. यामुळे गाझातील निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने लोकांच्या मदतीसाठी सर्व साहित्य पाठवले होते. मात्र, आता काही दहशतवादी टोळ्यांनी हा पुरवठा लुटला आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रायलच्या धोरणांना यासाठी जबाबदार धरले आहे.
गाझातील परिस्थिती अत्यंत गंभीर
सध्या हिवाळा सुरू झाला असून यामुळे पॅलेस्टिनी निर्वासितांना अनेक मानतावदी संकंटांचा सामना करावा लागत आहे. सध्या गाझातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो पॅलेस्टिनी तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहतात तसेच यामानतावदी मदतीवर अवलंबून आहेत. मात्र, या शसस्त्र दरोडेखोरांच्या टोळ्यांनी सर्व सामान लुटले आहे. यामुळे अनेक लोकांपर्यंत मदत पोहचलेली नसल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानतावदी मदत एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
60 हून अधिक ट्रक लुटले गेले
यूएनआरडब्ल्यूएचे प्रमुख फिलिप लेझारिनी यांनी सांगितले की, गाझाच्या दिशेने जाणाऱ्या केरेम शालोम क्रॉसिंग मार्गावरील परिस्थिती खूपच धोकादायक झाली आहे. नोव्हेंबरच्या मध्यातच सशस्त्र लुटारूंनी सुमारे 100 ट्रक लुटल्याचे त्यांनी नमूद केले. नुकतेच, शनिवारीही एका मदत खेपेला लुटले गेले. केरेम शालोम हा इजरायल आणि गाझा यांच्यातील मालवाहतुकीसाठी असलेला मुख्य मार्ग आहे. मे महिन्यात मिसर सीमेवरील राफा क्रॉसिंग बंद झाल्यापासून हा मार्ग गाझासाठी मदतीचा मुख्य स्त्रोत बनला आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्त्रायलवर आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यामध्ये गाझामध्ये पोहोचवलेल्या मदतीपैकी दोन-तृतियांश मदत केरेम शालोममार्गे पाठवण्यात आली होती. यापूर्वीच्या महिन्यांत हे प्रमाण आणखी जास्त होते. मात्र, इस्त्रायली हल्लयांमुळे अनके मानतावदी मदतींचे मुकसान झाले. यामुळे लेझारिनी यांनी गाझामधील गंभीर परिस्थितीला प्रामुख्याने इस्त्रायलच्या धोरणांना जबाबदार धरले. गाझामधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघाडामुळे मदतीचा पुरवठा अडथळ्यांत आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्त्रायली हल्ल्यांमध्ये अनेकजण ठार
इस्त्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण गाझातील राफा शहरावर झालेल्या वेगळ्या हल्ल्यात चार जण ठार झाले, अशी माहिती नासिर रुग्णालयाने दिली. गाझामध्ये सध्या अन्नधान्य, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, आणि या नव्या समस्येमुळे येथील लोकांचे जीवन आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात इस्त्रायली सैन्याचा जोरदार हल्ला; लहान मुलांसह 6 जण मृत्यूमुखी