फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: गेल्या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले चिन्मय दास यांच्या जामिन अर्ज सुनावणीची तारीख बांगलादेश न्यायालयाने निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीसाठी 3 डिसेंबर ही तारीख निवडण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चिन्मय दास यांना चितगाव महानगर पोलिसांनी अटक केली होती. या घटनेमुळे बांगलादेसात हिंदूं समाजात प्रचंड संताप उफाळला होता. चिन्मय दाल यांच्या अटकेविरोधात अनेक निदर्शने देखील काढण्यात आली.
सुनावणीची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती
चितगावचे अतिरिक्त उपायुक्त मोफिज-उर-रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्मय दास यांची सुनावणी महानगर सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफ-उल-इस्लाम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुनावणीची तारीख आधीच ठरवली असली तरी वकिलांच्या संपामुळे ही सुनावणी प्रक्रिया विलंबित झाली होती. सध्या हिंदू समाजात या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी जामीन अर्ज नाकरण्यात आला होता आणि चिन्मय दास यांना तुरूंगात पाठवण्यात आले होते. सध्या बांगलादेशा वातावरण चिघळले आहे.
बांगलादेश राष्ट्रध्वजाचा अपमान
चिन्मय दास यांना 30 ऑक्टोबर रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या आरोपानुसार, हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान चितगावच्या परिसरात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला. या घटनेमुळे एका वकिलाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर दास यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची बँक खाती फ्रीज करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वकिल आणि पत्रकारांवर गुन्हा दाखल
चिन्मय दास यांच्या अटकेनंतर रविवारी, दुसरे हिंदू पुजारी श्याम प्रभू यांनाही तुरुंगात भेट दिल्याने अटक करण्यात आली. या अटकेनंतर हिंदू समाज अधिक आक्रमक झाला असून देशभरात निषेध आंदोलने केली जात आहेत. यानंतर देशभरात उपस्थित चिन्मय दास प्रभूच्या समर्थकांनी आंदोलन केले आणि त्यात एका वकिलाचा मृत्यू झाला. वकिलाच्या हत्येनंतर वकील आणि पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याविरोधात आता बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने आवाज उठवत त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
भारतानेही निषेध केला
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा भारतातही तीव्र निषेध होत आहे. शुक्रवारी भारताने बांगलादेशमध्ये अतिरेकी वक्तृत्व आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने बांगलादेशी सरकारसमोर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने मांडला आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदाय हा अल्पसंख्याक असून, या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशातील सामाजिक आणि धार्मिक तणाव वाढत चालल्यामुळे या प्रकरणावर सरकारने त्वरित तोडगा काढण्याची मागणी होत आहे.