Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) येथील विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार, गोळीबार आणि मतदानात गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. रावलकोटसह अनेक भागांत निदर्शने, चकमकी आणि जीवितहानीच्या घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 28, 2026 | 01:31 PM
सर्वत्र फक्त मृतदेह...! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

सर्वत्र फक्त मृतदेह...! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

Follow Us
Follow Us:
  • ‘रावलकोटमध्ये सर्वत्र मृतदेह’
  • पीओके निवडणुकांदरम्यान हिंसाचाराने तणाव शिगेला
  • धांधलीच्या आरोपांमुळे राजकीय संघर्ष तीव्र
PoK ElectionsL: पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoJK/PoK) येथे स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, गोळीबार आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाला आहे. विविध राजकीय पक्षांनी एकमेकांवर निवडणुकीत गैरव्यवहार आणि बूथ कॅप्चरिंगचे आरोप केले असून, रावलकोट आणि कोटलीसारख्या भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रावलकोटमध्ये हिंसाचाराचा दावा

रावलकोटमध्ये गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी (JAAC) च्या आंदोलनावर कारवाईदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून गोळीबार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक जखमी आणि गोंधळाची परिस्थिती दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक नागरिकांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा दावा करत रस्त्यांवर जखमी आणि मृतदेह पडल्याचे म्हटले आहे. तसेच रुग्णवाहिकांची कमतरता असल्याने जखमींना खासगी वाहनांमधून किंवा खांद्यावरून रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला

शांततापूर्ण मोर्चावर गोळीबाराचा आरोप

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शांततापूर्ण मोर्चा काढणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी थेट गोळीबार केला. एका घटनेत १५ ते २० जणांना गोळ्या लागल्याचा दावा करण्यात आला असून, मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

⚡️BREAKING Pakistani authorities opened fire on peaceful protesters in Kashmir Pakistani sources: Large crowds had gathered in Drek Eidgah, Rawalakot, Azad Kashmir, to protest in boycott of the elections. Pakistani military and police forces responded with live ammunition,… pic.twitter.com/xAnLvidn6o — Warfare Analysis (@warfareanalysis) July 27, 2026

निवडणुकीत धांधलीचे आरोप

मीरपूर विभागातील १३ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कोटली जिल्ह्यातील निक्याल येथे मतदानादरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे ३५ वर्षीय कार्यकर्ते मुख्तार युनूस यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) समर्थकांवर बूथ कॅप्चरिंग आणि हिंसाचाराचे आरोप केले आहेत.

पीटीआयचा निवडणुकांवर बहिष्कार

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने या निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार टाकला आहे. काही स्थानिक नेते आणि आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, निवडणुकीचे निकाल आधीच ठरविण्यात आले असून, या प्रक्रियेत पाकिस्तानच्या लष्कराचा प्रभाव असल्याचा त्यांचा दावा आहे.

आंदोलनामागील प्रमुख कारणे

PoJKमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामागे अनेक कारणे असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

६०० हून अधिक नागरिक हक्क कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा.

JAAC या नागरिक हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचा आरोप.

महागाई, वीज-पाणी टंचाई आणि स्थानिक संसाधनांच्या कथित शोषणाविरोधात जनआक्रोश.

विधानसभा निवडणुकीतील निर्वासितांसाठी राखीव १२ जागा रद्द करण्याच्या मागणीवरून निर्माण झालेला वाद.

Middle East : अमेरिका ‘माफिया टोळीसारखी’ वागत आहे; पश्चिम आशियातील संकटासाठी इराणचा वॉशिंग्टनवर ठपका

मानवाधिकारांबाबत चिंता

आंदोलनकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमे तसेच मानवाधिकार संघटनांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या मते, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अधिकारांचे दमन होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Web Title: Pok election violence rigging allegations rawalakot protests bloodshed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Election
  • pakistan

संबंधित बातम्या

Bombay High Court : धर्माच्या नावावर मतांची मागणी नाही; ‘दुआ’ आणि ‘आमीन’ संदर्भात बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
1

Bombay High Court : धर्माच्या नावावर मतांची मागणी नाही; ‘दुआ’ आणि ‘आमीन’ संदर्भात बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.