Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशनंतर आता सीरियात सत्तापालट; राष्ट्रपतींनीच केलं पलायन

 बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतल्याची घोषणा केली आहे. रस्त्यांवर लोक जल्लोष करताना दिसत असून असद पळून गेल्याने आता दमास्कस मुक्त झाल्याचे बंडखोरांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 09, 2024 | 08:50 AM
बांगलादेशनंतर आता सीरियात सत्तापालट; राष्ट्रपतींनीच केलं पलायन

बांगलादेशनंतर आता सीरियात सत्तापालट; राष्ट्रपतींनीच केलं पलायन

Follow Us
Follow Us:

दमास्कस : गेल्या काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये राजकीय परिस्थिती बिघडली होती. तेथील पंतप्रधानांनी देश सोडून पलायन केले होते. असे असताना आता सीरियात सत्तापालट झाले आहे. मध्य पूर्वेतील सीरियावर बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात येताच ते देश सोडून पळून गेले आहेत.

हेदेखील वाचा : रशिया-इराणशी मैत्री, सौदीपासून दुरावा; सत्ताबदलानंतर सीरियातील समीकरणे बदलणार का?

सीरियात बंडखोरांनी पब्लिक रेडियो आणि टीव्ही बिल्डिंगवर नियंत्रण मिळवले आहे. बंडखोर संपूर्ण शहरात जल्लोष करत असून हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. काही बंडखोरांनी असद यांच्या वडिलांच्या पुतळ्यावर चढून तोडफोड केली. आम्ही बऱ्याच काळापासून या दिवसाची वाट पाहत होतो. सीरियात एका नव्या युगाची सुरुवात होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इस्लामी हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) या बंडखोर गटाला तुर्कस्तानचा पाठिंबा आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा अलेप्पो ताब्यात घेतले होते. यानंतर एक-एक करून शहरे जिंकून दमास्कसला पोहोचले. 50 वर्षांच्या अत्याचारानंतर बाथची राजवट संपुष्टात आली आहे, असे बंडखोर गटाने टेलिग्रामवर म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत अनेकांना सोडावे लागले आपले घर 

गेल्या काही वर्षांत अनेकांना आपले घर सोडावे लागले आहे. बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतल्याची घोषणा केली आहे. रस्त्यांवर लोक जल्लोष करताना दिसत असून असद पळून गेल्याने आता दमास्कस मुक्त झाल्याचे बंडखोरांनी सांगितले. कारागृहातील सर्व कैद्यांची सुटका करण्यात यावी, असे बंडखोरांनी दूरचित्रवाणीवरील निवेदनात म्हटले आहे.

बंडखोर हवेत गोळीबार करून जल्लोष 

२०१८ नंतर पहिल्यांदाच बंडखोर दमास्कसच्या आत दाखल झाले. अनेक वर्षांच्या वेढ्यानंतर २०१८ मध्ये सीरियन सैन्याने पुन्हा राजधानीच्या बाहेरील भागावर ताबा मिळवला. दमास्कस विमानतळ रिकामे करण्यात आले असून सर्व उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. बंडखोरांनी राजधानीच्या उत्तरेकडील सैदनाया लष्करी कारागृहात घुसून कैद्यांची सुटका केल्याचेही जाहीर केले.

नव्या सरकारसाठी बंडखोरांना प्रस्ताव

सीरियाचे पंतप्रधान मोहंमद अल जलाली यांनी सरकार निवडण्यासाठी सीरियन जनतेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, ते दमास्कसा विमानतळमार्गे सीरिया सोडून गेले आहेत. एएफपीने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

जगभरातून अनेक देशांमधून विधानं

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सीरियात लष्करी कारवाई टाळावी. ही आमची लढाई नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी कॅलिफोर्नियातील सभेत सांगितले की, सीरियातील यादवी युद्धात अमेरिका लष्करी हस्तक्षेप करणार नाही.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारत सोडा, अमेरिकाही नाही टिकणार, 4 दिवसांत कोलकाता काबीज करू’ ; बांगलादेशच्या रिटायर्ड मेजरचे वक्तव्य

Web Title: Political situation is changed in syria nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 08:50 AM

Topics:  

  • Bangladesh
  • political news
  • syria news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
1

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई
2

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
3

Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.