Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या
ढाका महानगर पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे. पोलिस आयुक्त मोहम्मद शफीकुल इस्लाम यांनी परिषेदत सांगितले की, हादी प्रकरणामध्ये एकूण 17 आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, हादीने सार्वजनिक रॅली आणि सोशल मीडियावर अवामी लीग आणि छात्र लीगच्या कारयवायांवर जोरदार टीका केली होती. यामुळे संतप्त होऊन हादीच्या हत्येचा कट रचण्यात आला. दरम्यान शफीकुल इस्लाम यांनी हेही स्पष्ट केले की, हादीच्या हत्येत भारत किंवा भारताच्या एजन्सींचा संबंध नाही.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना तपासात हादीची हत्या राजकीय सूडातून झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हादीने अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याच्या व्यक्तव्यामुळे या संघटनेने हादीच्या हत्येचे आदेश दिले. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, त्यांनी 17 आरोपींपैकी 12 जणांना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
शरीफ उस्मान हादी हा इंन्कलाब मंचचा प्रवक्ता होता. त्याने जुलै ते ऑगस्ट 2024 मध्ये माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना विरोधात झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हादीची बांगलादेशच्या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका लढवणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आले. १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. हादी गंभीर जखमी झाला होता. त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. नंतर १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादीच्या हत्येत सहभागी असलेला मुख्य आरोपी फैसल करीमचा छात्र लीगशी थेट संबंध होता. पल्लबी पोलिस स्टेशनचे माजी नगरसेवक आणि युथ लीगचे नेते तैजुल इस्लाम चौधरी यांच्या सांगण्यावरुन मसूदने हादीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच बप्पीने मसूद आणि दुसऱ्या आरोपी आलमगीर शेखला पळून जाण्यास मदत केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडे सध्या या प्रकरणाबाबत सर्व आणि वैध पुरावे असून हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात लवकरच मोठी कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.
Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक






