Pope Francis Death Pope Francis dies at 88 after complicated health battle, vatican update
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. फ्रान्सिस यांना फ्रेब्रुवारीमध्ये न्यूमेनियाचा आजारा झाला होता. यामुळे त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. फ्रान्सिस 88 वर्षाचे होते. दरम्यान व्हेटिकनने अधिकृतपणे त्यांच्या निधनाची घोषाण केली आहे. त्यांच्या निधनामुळे जगभरातील सुमारे 1.4 अब्ज कॅथलिक लोक दु:खात असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
पोप फ्रान्सिस यांना गेल्या आठवड्यामध्ये ब्रॉन्कायटिसचा त्रास झाला. 14 फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फ्रान्सिस यांना श्वसनाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु तेले. परंतु त्यांना जास्च त्रास होऊ लागला. त्यांना दोन्ही फूफ्फूसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले.
Pope Francis died on Easter Monday, April 21, 2025, at the age of 88 at his residence in the Vatican’s Casa Santa Marta. pic.twitter.com/jUIkbplVi2
— Vatican News (@VaticanNews) April 21, 2025
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर असूनही त्यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांची भेट घेतली होती. त्यानंचर त्यांची प्रकृची अधिक खालावली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हॅटिकने शनिवारी (19 एप्रिल) संध्याकाळी एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतर रविवारी सेंट पीटर्स स्क्वेअर येथे झालेले पारंपारिक प्रार्थनेत फ्रान्सिस सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांची प्रकृती अधिकच बळावली होती. यामुळे त्यांचे आयोजित कार्यक्रम व्हॅटिकनने रद्द केले. डॉक्टरांनी त्यांना आरामा करण्याचा सल्ला दिला होता. शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली आणि अखेर त्यांनी वेटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतला.