
President Droupadi Murmu reaches Angola as part of two-country state visit
President Droupadi Murmu Two-Country State Visit : नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) सध्या आफ्रिकन देश अंगोलाच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी (०८ नोव्हेंबर) रात्री त्या अंगोलाची राजधानी लुआंडाला पोहोचल्या असून येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भारताच्या राष्ट्रप्रमुखांचा हा आफ्रिकन देशाला पहिलाच दौरा आहे.
हा दौरा ऐतिहासिक मानला जात असून हा भारताच्या आफ्रिका आणि साउथ ग्लोबलशी असलेल्या संबंधाचे प्रतिबिंब मानला जात आहे. मुर्मू यांचा दौरा हा अंगोलाच्या समकक्ष जोआओ लारेन्को यांच्या निमंत्रणावरुन होत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत हा दौरा असणार आहे. सध्या या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलमध्ये पोहोचल्या आहेत.
दरम्यान अंगोलाच्या भेटीत द्रौपदी मुर्मू ११ नोव्हेंबर रोजी अंगोलाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी त्या अंगोलाच्या संसेदाला संबोधित करतील. याशिवाय भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत.
राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात दक्षिणकेडच्या देशांसोबत, विशेष करुन आफ्रिकेसोबत होणार आहे. यावेळी राजकीय, आर्थिक, विकास आणि सांस्कृतिक अशा पैलूंवर आफ्रिकेसोबत भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आहे. गेल्या काही काळापासून भारत याकडे विशेष लक्ष देत आहे. या भेटीत बोत्सावाना देखील सामील आहे. यावेळी त्या प्रोजेक्ट चीता अंर्तगत बोत्सावानातून चित्त्यांच्या स्थलांतरवर चर्चा करणार आहेत.
बोत्सवानाला पुन्हा भेट
सहा महिन्यांपूर्वी मे महिन्याच्या सुरुवातील मुर्मू यांनी बोत्सवानाला भेट दिली होती. यावेळी देखील लॉरेन्को यांनी निमंत्रण दिले हाते. सध्या त्या ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान अध्यक्ष डुमा गिदोन बोको यांच्या निमंत्रणावरुन बोत्सवानाला भेट देणार आहेत. या भेटीत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, उर्जा, शेती, आरोग्य, औषधनिर्मिती, संरक्षण आणि लोकांमध्ये दळण-वळण या विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली जाणार आहे.
याशिवाय बोत्सवानाच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करती. तसेच तेथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना देखील भेट देणार आहेत. गेल्या काही काळात भारत आणि आफ्रिकेच्या संबंधामध्ये सुधारणा होत आहे. डिजिटल क्षेत्र, उर्जा संक्रमण, खनिजे आणि बहुपक्षीय सहकार्यात दोन्ही देशात सहकार्य वाढत आहे.
भारतासाठी धोक्याचा इशारा! चीनचे तिसरे विमानवाहू जहाज ‘फुजियान’ समुद्रात; अमेरिकेचीही उडाली झोप
Ans: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन देश अंगोलाच्या दौऱ्यावर आहेत.
Ans: अंगोलाच्या दौऱ्यादरम्यान राजकीय, आर्थिक, विकास आणि सांस्कृतिक यांसारख्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
Ans: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलानंतर बोत्सवानाला भेट देणार आहेत.
Ans: व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, उर्जा, शेती, आरोग्य, औषधनिर्मिती, संरक्षण आणि लोकांमध्ये दळण-वळण या विषयांवर बोत्सवाना भेटीत द्विपक्षीय चर्चा केली जाणार आहे.