भारतासाठी धोक्याचा इशारा! चीनचे तिसरे विमानवाहू जहाज 'फुजियान' समुद्रात; अमेरिकेचीही उडाली झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China Third Aircraft Fujian Launching : बीजिंग : एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनच्या (China) संरक्षण क्षेत्रात आणखी वाढ झाली आहे. चीनने आपले तिसर विमानवाहू जहाज फुजियान लॉन्च केले आहे. यामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच अमेरिका (America), भारत आणि फिलिपिन्समध्ये पॅसिफिक महासागरात तणाव वाढला आहे.
Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्ध पुन्हा भडकणार? इस्तंबूलमधील शांतता चर्चा अयशस्वी; सीमावाद कायम
चीनचे हे नवे विमानवाहू जहाज इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, याची अमेरिकेशी तुलना केली जात आहे. शनिवारी (०८ नोव्हेंबर) चीनच्या नौदलाने फुजियानच्या डेमोचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. या आठवड्यात याच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यासाठी स्वत:हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार आहेत.
या विमानवाहू जहाचाचे पहिले दोन मॉडेल्स हे यूएस जेराल्ड फोर्ड-क्लास विमानवाहू जहाजाच्या तंत्रज्ञानावर आधारित होते, पण हे नवे तिसरे फुजियान इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापल्टवर आधारित आहेत. यामुळे लढाऊ विमानांना लहान धावपट्टीवरुनही सहज उड्डाण घेता येते.
गेल्या काही काळात चीन सतत आपली संरक्षण क्षमता आणि लडाऊ क्षमता वाढवत आहे. नुकतेच चीनने लष्करी परेड डे निमित्त आपल्या ताफ्तात अनेक अत्याधुनिक शस्त्रे सामील केली होती. यामध्ये लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींचा सहभाग होता. DF-61 आणि JL-3 ही सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, तर DF-61 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि पाणबुडीतून डागता येणारे JL-3 क्षेपणास्त्र ताफ्यात सामील केले होते. याचे भव्य प्रदर्शनही करण्यात आले होते.
याद्वारे चीनने संपूर्ण जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तज्ज्ञांच्या मते चीनला जगभरातील देशांना स्वत:कडे शस्त्रे खरेदी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेऐवजी ते एक उत्तम पर्याय बनू शकतात आणि पाश्चत्य देशांंचे नेतृत्व करु शकतात असा संदेश या लष्करी प्रदर्शनातून दिला जात आहे.
भारतासाठी चिंतेची बाब?
चीनच्या या नव्या तिसऱ्या फुजिनयान विमानवाहू जहाजामुळे भारत सध्या चिंतेत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रापासून ते हिंद महासागरापर्यंत लष्करी उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या नौदलात फुजियानची भर ही लष्करी कारवायांना अधिक गती देईल. या जहाजावरुन विमाने मोठ्या क्षेत्रांवर सहज हल्ला करु शकतात. यामुळे भारताच्याच नव्हे तर, अमेरिका, तैवान, फिलिपिन्स आणि जपानसाठी धोका निर्माण झाला आहे.






