राष्ट्रपती मुर्मू यांचा तिमोर-लेस्टेत सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या मुक्कामावर शनिवारी दक्षिण-पूर्व आशियातील तिमोर-लेस्टे येथे पोहोचल्या. तिमोर-लेस्टेची राजधानी दिली येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती जोस रामोस-होर्टाने द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड-कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ देऊन सन्मानित केले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिल्लीत सांगितले की, भारताचा दूतावास लवकरच तिमोर-लेस्टे येथे सुरू होणार आहे. हा देश ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीच्या अगदी जवळ आहे. राष्ट्रपती कार्यालयाने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मुर्मू (66) यांना त्यांच्या सामाजिक सेवेतील कामगिरी आणि शिक्षण, सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या समर्पणासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हा सन्मान भारत आणि तिमोर-लेस्टे यांच्यातील मैत्रीचे प्रतिबिंब आहे. याआधी त्यांनी न्यूझीलंड आणि फिजीला भेट दिली होती. विशेष म्हणजे, भारताची दक्षिणपूर्व आशियात तरुण राष्ट्रापर्यंतचा पहिलाच राष्ट्रपतींचा दौरा आहे. तिमोर-लेस्टेला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही देण्यात आला.
राष्ट्रपती मुर्मू यांनी तिमोर-लेस्टेचे राष्ट्रपती होर्टा यांच्याशी विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींनी माहिती तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधनिर्माण, कृषी, क्षमता निर्माण आणि इतर क्षेत्रात भारत व तिमोर-लेस्टे यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर विस्तृत चर्चा केली.” “भारत आणि तिमोर-लेस्टे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, जे लोकशाही आणि बहुलवादाच्या मूल्यांसाठी समान वचनबद्धतेवर आधारित आहेत. मला विश्वास आहे की यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि सहकार्य संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला आहे.