President Trump meet privately with Ukrainian President Volodymyr Zelenskyy in St. Peter’s Basilica in Vatican City
वॉशिंग्टन: कॅथलिक चर्चचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे शनिवारी (26 एप्रिल) अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगभारतील राष्ट्रप्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पोप यांच्या अत्यंसंस्काराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देखील उपस्थित होते. यादरम्यान त्यानी व्हॅटिकन सिटीमध्ये भेट घेतली. व्हाईट हाउसमधील जोरदार वादाविवादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची ही पहिलीच भेट होती.
व्हाईट हाऊसने सोशल मीडियाच्या अधिकृत पॅटफॉर्म एक्सवरुन झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या भेटी माहिती दिली. पोस्टमध्ये व्हाईट हाऊसने म्हटले की, व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात भेट झाली.
President Trump sat down to meet privately with Ukrainian President Volodymyr Zelenskyy in St. Peter’s Basilica in Vatican City this morning. pic.twitter.com/QChPiZRKzM
— The White House (@WhiteHouse) April 26, 2025
या बैठकीदरम्यान झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु दोन्ही नेत्यांनी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. तसेच यावेळी केवळ ट्रम्प आणि झेलेन्स्की उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वी 28 फेब्रुवारी 2025 रोजी व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या चर्चा झाली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद झाला होता. या वादविवादानंतर ही दोन्ही नेत्यांमधील पहिलीच भेट आहे. या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, या बैठकीमुळे त्यांना अपेक्षित असलेली शांतता निर्माण झाली आहे. परंतु नेमकं काय चर्चा करण्यात आली यावर झेलेन्स्की यांनी मौन धरले आहे.
फेब्रुवारीतील वादविवादानंतर झालेली ही शांततापूर्ण बैठक उल्लेखनीय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या शांतता चर्चेदरम्यान ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले की, युक्रेनियन लोकांच्या सुरक्षेसाठी ही चर्चा झाली. ही चर्चा पूर्ण आणि बिनशर्त झाली आहे. ही एक प्रतीकात्मक बैठक होती. धन्यवाद, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.
याच दरम्यान दुसरीकडे रशियाने डाव साधत युक्रेनच्या ताब्यात असलेला कुर्स्क प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. याची पुष्टी स्वत:हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली आहे. दरम्यान अनेकांनी म्हटले आहे की, पुतिन यांना युद्ध सुरुच ठेवायचे आहे. शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला असूनही रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत आहे.