Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 07, 2022 | 09:33 AM
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला
Follow Us
Follow Us:

वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अडचणीत आले होते. मात्र, बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी त्यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवले. एकूण ३५९ मते नोंदवण्यात आली. यामधील २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

बोरिस जॉन्सन यांना आपल्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने पंतप्रधान काळातील सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. लॉकडाउन काळात निर्बंध असतानाही बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत १० डाउनिंग स्ट्रिट येथे पार्टी केली होती. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. याचप्रकरणी त्यांच्याच पक्षातील ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर प्रचंड दबाव होता. भारत दौऱ्यादरम्यानही हा दबाव कायम होता. पार्टीगेट घोटाळ्यावरून टीका होत असतानाच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या तब्बल ५४ खासदारांनी राजीनाम्याची मागणी केली. यामुळे विश्वासदर्शक ठरावाची १५ टक्के आवश्यकता पूर्ण झाली होती. यासोबत पंतप्रधान जॉन्सन यांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतपत्रिका घेण्यात आली होती.

बोरिस जॉन्सन यांना अविश्वास ठराव जिंकण्यासाठी १८० खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. मतदानाआधी बोरिस जॉन्सन यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पुन्हा एकदा पक्षाला विजय मिळवून देऊ असा विश्वास दिला.

Web Title: Prime minister of the united kingdom won the confidence vote nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • britain
  • prime minister
  • rising inflation

संबंधित बातम्या

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च
1

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण
2

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.